Advertisement

पाळीव प्राण्यांसाठी सीएनजीवर स्मशानभूमी, पण माणसांचं काय?

महापालिकेने कुत्रे व मांजर या पाळीव प्राण्यांसाठी सीएनजीवर आधारीत स्मशानभूमी उभारण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मनुष्यांवरील अंत्यसंस्कारासाठी वेळेवर स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध करून न देणारी महापालिका पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी तरी वेळेत स्मशानभूमी उपलब्ध करून देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पाळीव प्राण्यांसाठी सीएनजीवर स्मशानभूमी, पण माणसांचं काय?
SHARES

मुंबईतील ११ स्मशानभूमी या गॅस दाहिन्यांमध्ये रुपांतरीत करून सीएनजी करण्याचे काम अद्यापही रेंगाळलेलेच आहे. हे काम गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्रतिक्षेतच आहेत. त्यातच आता महापालिकेने कुत्रे व मांजर या पाळीव प्राण्यांसाठी सीएनजीवर आधारीत स्मशानभूमी उभारण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मनुष्यांवरील अंत्यसंस्कारासाठी वेळेवर स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध करून न देणारी महापालिका पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी तरी वेळेत स्मशानभूमी उपलब्ध करून देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


मुंबईत ३ ठिकाणी प्राण्यांसाठी स्मशानभूमी

महापालिका क्षेत्रात कुत्रे व मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांची मोठी संख्या आहे. अनेक घरांमध्ये हे पाळीव प्राणी घरातील एक सदस्यच असतात. वयोमानपरत्वे किंवा अन्य कारणांमुळे या प्राण्यांचा मृत्यु झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे सुकर व्हावे, या दृष्टीने ३ ठिकाणी स्मशानभूमी उभारण्याच्या प्रशासकीय प्रस्तावास महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मंजूरी दिली आहे.




पर्यावरणपूरक सीएनजी इंधन

यानुसार शहर भागात महालक्ष्मी, पूर्व उपनगरांमध्ये देवनार, तर पश्चिम उपनगरात मालाड परिसरात स्मशानभूमी उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या तिन्ही स्मशानभूमी पर्यावरणपूरक पद्धतीने 'सीएनजी' या इंधनावर आधारित असणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेट्ये यांनी दिली आहे.


स्मशानभूमीसाठी २ कोटी खर्च

महालक्ष्मी, देवनार व मालाड येथे पर्यावरणपूरक स्मशानभूमी 'सार्वजनिक खाजगी भागीदारी' तत्वावर (पीपीपी) उभारण्याचे प्रशासकीय स्तरावर प्रस्तावित करण्यात आले आहे. या प्रत्येक स्मशानभूमीसाठी साधारणपणे २ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

सध्या महापालिका क्षेत्रात परळ परिसरात पाळीव प्राण्यांसाठी एक खाजगी अंत्यसंस्कार केंद्र असून ते एका स्वयंसेवी संस्थेद्वारे संचालित आहे. तर महापालिका क्षेत्रातील भटक्या जनावरांच्या मृतदेहाच्या विल्हेवाटीची कार्यवाही ही बोरिवली परिसरातल्या 'कोरा केंद्र' या स्वयंसेवी संस्थेद्वारे केली जाते.


'त्या' ११ स्मशानभूमींचं झालं काय?

जळाऊ लाकडांचा वापर कमी करून टप्प्याटप्प्याने गॅस दाहिन्या सुरु करण्याचा धोरणात्मक निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ११ स्मशानभूमी निवडल्या होत्या. मात्र त्यातल्या ७ स्मशानभूमींचे काम अद्याप सुरुच आहे, तर उर्वरीत ४ स्मशानभूमींचे काम अद्याप सुरुही झालेले नाही. मागील तीन वर्षांपासून ही स्वप्ने दाखवली जात आहेत.


आकडेवारी काय सांगते?

० वर्ष २०१२ च्या प्राणी गणनेनुसार मुंबईत ३३ हजार ५७२ भटके कुत्रे
० वर्ष २०१४ मध्ये प्राणी गणनेनुसार मुंबईत ९५ हजार १७२ भटके कुत्रे
० आतापर्यंत ६९ हजार २३९ कुत्र्यांचे निर्बिजीकरण
 मुंबईत ३००हून अधिक पशुवैद्यकीय दवाखाने
 पाळीव प्राण्यांसाठीचा खार येथे स्वतंत्र दवाखाना



हेही वाचा

चंदनवाडी स्मशानभूमी दुरुस्तीच्या प्रतिक्षेत


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा