Advertisement

चंदनवाडी स्मशानभूमी दुरुस्तीच्या प्रतिक्षेत


चंदनवाडी स्मशानभूमी दुरुस्तीच्या प्रतिक्षेत
SHARES

गेल्या कित्येक महिन्यांपासून अंतर्गत दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या चिराबाजार येथील चंदनवाडी स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे त्याची स्व:खर्चाने स्वतंत्ररित्या स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी कुलाबा अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट (कुलाबा एएलएम) यांनी केली आहे.

पालिका स्वतः दुरुस्ती करत नाही आणि आम्हालाही स्ट्रक्टरल ऑडिट, दुरुस्तीची परवानगी पालिकेचे आरोग्य खाते देत नसल्याचे कुलाबा एएलएमचे म्हणणे आहे.

ए, बी आणि सी या पालिका विभागातील नागरिकांसाठी चंदनवाडी ही एकमेव हिंदू स्मशानभूमी आहे. येथील तीन विद्युत दाहिन्यांपैकी एकच विद्युत दाहिनी सुरू आहे. त्यामुळे येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते.


विदयुत दाहिन्या दुरुस्तीविना बंद

2016 मध्ये तब्बल दोन महिने तीन विदयुत दाहिन्या दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. 12 एप्रिल 2017 पासून 8 तासच येथे विदयुत पुरवठा सुरू असतो. विदुयत दाहिनी असलेल्या परिसरातील प्रार्थना हॉल महिनाभरापासून बंद अवस्थेत आहे. या हॉलमध्ये जागोजागी छतावरील स्लॅब कोसळले आहे. 4 ऑगस्ट 2017 रोजी स्लॅब कोसळून जमिनीवरील फरश्या आणि बसण्याच्या प्लॅस्टिकच्या खुर्च्या देखील तुटलेल्या आहेत. हॉलमध्ये वारंवार स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत असल्यामुळे तेथे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी हॉल आजतागायत कुलूपबंद ठेवण्यात आला असल्याची माहिती कुलाबा एएलएमच्या सदस्यांनी दिली.


पालिका अधिकारी देतात उडवाउडवीची उत्तरे - रेणू कपूर

ए, बी आणि सी या तीन पालिका विभागात राहणाऱ्या नागरिकांसाठी चंदनवाडी ही एकमेव स्मशानभूमी आहे. दाहिनीची नादुरुस्ती आणि अंतर्गत नादुरुस्तीमुळे येथे अंत्यविधी पार पडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे 22 ऑगस्ट रोजी आम्ही कुलाबा एएलएमच्या सदस्यांनी तेथे पाहणी केली. स्वखर्चाने त्याच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेण्याचे ठरवले. स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची देखील सी पालिका विभागाकडे लेखी परवानगी मागितली. मात्र या गंभीर समस्येकडे पालिका अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून पालिका अधिकारी विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप कुलाबा एएलएमच्या रेणू कपूर यांनी केला आहे. एकीकडे पालिका इंधन बचतीचा संदेश देते मात्र विद्युत दाहिनीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून इंधन वाया घालवत असल्याचे कपूर म्हणाल्या.

वॉर्ड स्तरावर आम्ही स्लॅब दुरुस्ती आणि इतर डागडुजी करणार आहोत. मात्र दाहिनीच्या दुरुस्तीसाठी अधिक खर्च येणार आहे. त्याबाबत पालिकेच्या आरोग्य खात्याला कळवण्यात आले आहे.
- जीवक घेगडमल, सहायक आयुक्त, सी विभाग


हेही वाचा - 

बर्वेनगर हिंदू स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण रखडणार!

धारावीच्या स्मशानभूमीत आधुनिक चिमणी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा