Advertisement

म्हाडा भवनातलाच स्लॅब कोसळला, मुंबईकरांची काय तऱ्हा!


म्हाडा भवनातलाच स्लॅब कोसळला, मुंबईकरांची काय तऱ्हा!
SHARES

संपूर्ण मुंबईत परवडणारी घरं बांधण्याची जबाबदारी म्हाडावर आहे. आजपर्यंत हजारो कुटुंबांना म्हाडानं अशी घरं दिली आहेत. या घरांमध्ये अनेक संसार सुरक्षित वास्तव्य करत आहेत. मात्र मुबईकरांना हे सुरक्षित वास्तव्य देणाऱ्या म्हाडाचे कर्मचारीच सुरक्षित नाहीयेत. आणि तेही चक्क म्हाडाच्याच कार्यालयात! नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे सिद्ध झालं आहे.



स्लॅब कोसळला, पण दुर्घटना टळली!

बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास म्हाडा भवनाच्या सचिव कार्यालयातल्या स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. सुदैवाने यावेळी सचिव कार्यालयात कर्मचाऱ्यांची वर्दळ काहीशी कमी होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र तरी एक कर्मचारी जखमी होता होता थोडक्यात बचावला.

वांद्र्याच्या म्हाडा भवन इमारतीची प्रचंड दुरवस्था झाली आहे. डागडुजीच्या नावाखाली वेळोवेळी लाखोंचा खर्च केला जातो. पण तरीही इमारतीची अवस्था 'जैसे थे'च आहे. त्यामुळेच स्लॅब कोळण्याची ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे म्हाडा इमारतीच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून कर्मचारीही धास्तावले आहेत.


ऑडिट करणार कोण?

म्हाडा भवनाची इमारत आता 40 वर्षांहून अधिक जुनी झाली आहे. संपूर्ण भवनातील भिंतींना भेगा पडल्या असून इमारतींच्या सळयाही गंजल्या आहेत. इमारत दुरूस्तीच्या पलीकडे गेली असताना तात्पुरती डागडुजी करत वेळ मारुन नेली जात आहे. मुळात म्हाडा इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करत त्यानुसार इमारतीची दुरूस्ती वा पुनर्विकास करण्याची गरज आहे. असे असताना म्हाडा प्रशासनाकडून मात्र हे होताना दिसत नाही.

इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते का? वा करण्यात आले आहे का? याबाबत कर्मचाऱ्यांमध्येच संभ्रम आहे. काही कर्मचाऱ्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट झालेच नसल्याचा दावा केला आहे. मात्र म्हाडाचे अधिकारी याबाबत अधिकृतपणे बोलण्यास टाळाटाळ करताना दिसतात.



प्रशासनाचं दुर्लक्ष?

म्हाडा भवन हे म्हाडाचे मुख्यालय असून या मुख्यालयात एक हजाराहून अधिक कर्मचारी-अधिकारी काम करतात. तर बँक आणि इतर शासकीय कार्यालयेही येथे असल्याने त्यांचीही संख्या मोठी आहे. दरम्यान, कामासाठी दररोज हजारोंच्या संख्येने लोक म्हाडा भवनात येतात. अशावेळी इमारतीची दुरवस्था झाल्याने एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल आता विचारला जात आहे. तर इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी कर्मचारी-अधिकाऱ्यांनी उचलली आहे. त्याचबरोबर फायर ऑडिटकडेही म्हाडा प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे.

म्हाडा भवनाची जबाबदारी असलेल्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्ट्रक्चर ऑडिट किंवा फायर ऑडिट आणि इमारतीच्या दुरवस्थेबाबत अधिक बोलणे टाळले आहे.


मी मंत्रालयात असताना स्लॅब कोसळल्याच्या दुर्घटनेची माहिती मिळाली. यासंबंधी पूर्ण माहिती घेतल्यानंतरच अधिक बोलेन. 

सुभाष लाखे, मुख्य अधिकारी, म्हाडा मुंबई मंडळ




हेही वाचा

म्हाडा, आधी घुसखोर बाहेर काढाः लोकलेखा समितीचे ताशेरे

म्हाडाच्या टीटबिट भूखंडाचे वितरण आता सरकार करणार


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा