Advertisement

पनवेल रेल्वेस्थानकात खोदलेल्या खड्ड्यात बुडून ३ मुलींचा मृत्यू

या तिन्ही मुली मुळच्या अमरावतीच्या असून कुटुंबासोबत रस्त्यावर फुगे विक्रीचा व्यवसाय करत होत्या. सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास या तिन्ही मुली रेल्वेस्थानकाजवळील मोकळ्या जागेत खेळत होत्या. याच ठिकाणी रेल्वे स्थानकाच्या वाढीव बांधकामासाठी खोदकाम करण्यात आलं होतं. या खड्ड्यात पाणी साचलं होतं. या खड्ड्यात तिघीही पडल्या.

पनवेल रेल्वेस्थानकात खोदलेल्या खड्ड्यात बुडून ३ मुलींचा मृत्यू
SHARES

नवी मुंबईतील पनवेल रेल्वे स्थानकाचं प्लॅटफॉर्म वाढवण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ३ मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रेशम भोसले (१३), रोहिता भोसले (१०) आणि प्रतीक्षा भोसले (०८) अशी मृत मुलींची नावे आहेत. रेल्वेस्थानकाजवळील मोकळ्या जागेत खेळत असताना ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

खेळताना दुर्घटना

या तिन्ही मुली मुळच्या अमरावतीच्या असून कुटुंबासोबत रस्त्यावर फुगे विक्रीचा व्यवसाय करत होत्या. सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास या तिन्ही मुली रेल्वेस्थानकाजवळील मोकळ्या जागेत खेळत होत्या. याच ठिकाणी रेल्वे स्थानकाच्या वाढीव बांधकामासाठी खोदकाम करण्यात आलं होतं. या खड्ड्यात पाणी साचलं होतं. या खड्ड्यात तिघीही पडल्या.

उपचारांपूर्वीच मृत्यू

ही घटना घडताच परिसरातील नागरिक व रजत एकता मित्र मंडळाच्या तरुणांनी तिघींनाही पाण्यातून बाहेर काढलं. मात्र तिघींच्याही नाकाताेंडात पाणी गेल्याने तिघीही बेशुद्ध पडल्या. तिघींपैकी एकीला नवी मुंबई महापालिका रुग्णालयात आणि दोघींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

हेही वाचा-

नालासोपाऱ्यात सातव्या मजल्यावरून पडून चिमुरडीचा मृत्यू

डॉक्टर तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकणारा अटकेत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा