Advertisement

अागीत ६ वर्षात ३०० लोकांचा मृत्यू


अागीत ६ वर्षात ३०० लोकांचा मृत्यू
SHARES

मुंबईत आगीचे सत्र सुरु असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या ६ वर्षात मुंबईत तब्बल २९ हजार १४० आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. या अागींमध्ये ३००  जणांचा बळी गेला. तर ९२५ लोक जखमी झाले आहेत.  आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे गेल्या ६ वर्षात  आगीच्या दुर्घटना किती घडल्या आणि किती लोकांचा मृत्यू झाला याबाबत माहिती मागवली होती.  मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीतून ही बाब समोर अाली.

मुंबईत २०१२ पासून ते २०१८ पर्यंत लागलेल्या २९ हजार १४० आगींच्या दुर्घटनेत .  १२० अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दलाचे जनमाहिती अधिकरी तथा विभागीय अग्निशमन अधिकारी ए. वी. परब यांनी दिली.


वर्ष  
अागींची संख्या  
मृत्यू    
जखमी
२०१२-२०१३
४७५६
६२
१७७
२०१३-२०१४  
४४००
५८
१४१
२०१४-२०१५
४८४२
३२
 १२५
२०१५-२०१६
५२१२
 ४७
१२८
२०१६-२०१७
५०२१
३४
 ११५
२०१७-२०१८
४९२७  
५५
२१९
जाने. २०१८ ते एप्रिल २०१८  
७१०

२०



हेही वाचा -      

पेट्रोल, डिझेलच्या दरात सलग १३ व्या दिवशी घट

दहावी-बारावीची फेरपरीक्षा १७ जुलैपासून


                                                                                                                     
         

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा