Advertisement

दहावी-बारावीची फेरपरीक्षा १७ जुलैपासून

दहावी, बारावीच्या नापास विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेला जुलै महिन्यापासून सुरुवात होणार आहे.

दहावी-बारावीची फेरपरीक्षा १७ जुलैपासून
SHARES

यंदा दहावी किंवा बारावीत नापास झाला असाल आणि याच वर्षी पुढील शिक्षण घेता येणार नाही म्हणून निराश असाल तर आता काळजी करण्याची गरज नाही. कारण नापास विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेला येत्या जुलै महिन्यापासून सुरुवात होणार आहे.


'या 'तारखेला होणार फेरपरीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावी बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षा ९ जुलै ते १६ जुलै दरम्यान घेतली जाणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा येत्या १७ जुलैपासून सुरू होणार २ ऑगस्टला ही परीक्षा संपणार आहे. 



९ केंद्रांवर परीक्षा

 बारावी बोर्डाची लेखी परीक्षाही १७ जुलैला सुरू होऊन ४ ऑगस्टला संपणार आहे.  या परीक्षेचं वेळापत्रक मात्र अद्याप जाहीर केलेलं नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मुंबई, कोकण, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि लातूर या नऊ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.


 ४ ते १३ जूनदरम्यान अर्ज

बारावीच्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षांच्या अर्जासाठी ४ ते १३ जून ही तारीख देण्यात आली असून त्यानंतर १९ जूनपर्यंत लेट फी भरून अर्ज करता येणार आहे. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षांचे अर्ज करण्यासाठी अद्याप बोर्डाकडून कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. फेरपरीक्षांसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ कॉलेजमार्फत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.



हेही वाचा -

सामाईक प्रवेश परीक्षांसाठी एकच कक्ष!

जेईई परीक्षेत मुंबईचा ऋषी अग्रवाल राज्यात पहिला



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा