Advertisement

कॉलेज लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद, 'इतक्या' विद्यार्थ्यांचे झाले लसीकरण

२ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली जात आहे.

कॉलेज लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद, 'इतक्या' विद्यार्थ्यांचे झाले लसीकरण
SHARES

२ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली जात आहे. याअंतर्गत ३०५ महाविद्यालयांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. महाविद्यालयांध्ये सुरू करण्यात आलेल्या मिशन युवा स्वास्थ्य अभियान या मोहिमेला विद्य़ार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.  

पहिल्या दिवशी १२ हजार ७७२ विद्यार्थ्यांनी लस घेतली. मंगळवारी ही संख्या जवळपास ३० टक्क्यांवर गेली.

टाइम्स ऑफ इंडियानं वृत्त दिलं आहे की, महाविद्यालयांमध्ये विशेष कोरोनाव्हायरस लसीकरण योजनेच्या पहिल्या दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात एकूण ३१ हजार ६७२ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

लसीकरणाच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी, राज्य सरकारनं कॉलेज कॅम्पसमध्ये पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आठवडाभर चालणारी विशिष्ट लसीकरण मोहीम जाहीर केली.

सरकारी आकडेवारीनुसार, पुण्यातील महाविद्यालयांनी मंगळवारी सर्वाधिक लसीकरण केले. तर पनवेल पिछाडीवर आहे. एकूण २२७ उच्च शिक्षण संस्था, तसंच ७८ तांत्रिक शैक्षणिक संस्था त्यांच्या कॉलेज कॅम्पसमध्ये लस पुरवत आहेत.

मुंबईत मात्र ही संख्या तुलनेनं कमी आहे. काही शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांकडून प्राथमिक आकडेवारी शोधत आहेत. यादरम्यान, त्यांच्या लक्षात आलं की कॅम्पसमधील काही प्रमुख टक्के लोकांना आधीच लस टोचण्यात आली होती.

उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातील सुमारे ५००० महाविद्यालये पॉलिटेक्निक, व्यावसायिक महाविद्यालये, आयटीआय तसंच इतर संलग्न आस्थापनांचा समावेश करतात. यामध्ये १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे जवळपास ४० लाख विद्यार्थी आहेत.



हेही वाचा

मुंबईत पालिका उभारणार अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय

लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मुंबईत फिरते केंद्र

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा