Advertisement

मुंबईत पालिका उभारणार अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय

महापालिकेनं मुंबईत अत्याधुनिक असं कर्करोग रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत पालिका उभारणार अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय
SHARES

महापालिकेनं मुंबईत अत्याधुनिक असं कर्करोग रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबांतील कर्करुग्णांना स्वस्तात उपचार करता येतील. यासोबतच किफायतशीर दरानं उपचार करता येतील अशी ‘प्रोटॉन थेरपी’ या रुग्णालयात देण्यात येणार आहे.

अद्याप या प्रकल्पासाठी मुंबईत जागेची चाचपणी पालिका करत आहे. याच्या नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.

प्रोटोन थेरपीसह केमोथेरपी, मॅमोग्राफी, सोनोग्राफी, डेटा अनालेसीस, ब्रेकीथेरपीसह कर्करोगावरील अत्याधुनिक उपचार सुविधा मिळणार आहेत. यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे.

सल्लागार प्रोटोन थेरपीसाठी तांत्रिक तपशील आणि यंत्रसामग्रीचे तपशील तयार करणे, प्रकल्पाचा आराखडा तयार करणे, मुंबईत प्रकल्पासाठी जागा निश्चित करणे, पुरवठादार ओळखणे आणि कामकाज वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी पर्यवेक्षण करणे अशी कामे तो करणार आहे.

प्रकल्प कसा?

  • ३ एकर क्षेत्रावर हे कर्करोग रुग्णालय उभारले जाणार आहे.
  • या प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
  • सल्लागारासाठी २ कोटी ८० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
  • प्रकल्प अहवाल सादर करण्याकरिता पालिकेच्या तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
  • केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि रेडिओलॉजी विभागप्रमुख डॉ. हेमंत देशमुख हे समितीचे अध्यक्ष आहेत.

प्रोटोन उपचारपद्धती म्हणजे?

प्रोटोन उपचारपद्धतीद्वारे कमीत कमी मात्रेचा डोस देऊन कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यात येतात. केमोथेरपीचे सर्व दुष्परिणाम टाळून शरीरातील इतर पेशी न मारता फक्त कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करणारी आणि केवळ कर्करोगाच्या गाठीवर लक्ष्य करणारी ही किरणोत्सर्ग (रेडिएशन) प्रकारातील प्रोटोन उपचारपद्धती आहे.



हेही वाचा

मुंबईतील लसीकरणाला वेग; महापालिका स्वत: पोहोचणार लाभार्थ्यांपर्यंत

लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मुंबईत फिरते केंद्र

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा