Advertisement

मुंबईतील 'इतके' खासगी केंद्र लसीअभावी बंद

अनेक जण लसीकरणासाठी गेले होते. मात्र, अपुऱ्या लसीच्या साठ्यामुळं हे केंद्र बंद करण्यात आले.

मुंबईतील 'इतके' खासगी केंद्र लसीअभावी बंद
SHARES

कोरोना संसर्ग होत असताना लसीकरण करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, अपुऱ्या लसीच्या साठ्यामुळे आता मुंबईतील ३५ हून अधिक खासगी लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. यामध्ये चेंबूर परिसरातील सुश्रुत रुग्णालयाचा देखील समावेश आहे. याठिकाणी अनेक जण लसीकरणासाठी गेले होते. मात्र, अपुऱ्या लसीच्या साठ्यामुळं हे केंद्र बंद करण्यात आले.राज्यासह मुंबईत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठ्या संख्येनं वाढ होताना दिसत आहे. एकीकडे कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होत आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजनसह आता लसीकरणाचा देखील तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे.

राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे दिसत आहे. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमुळे आता रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना आता पुन्हा एकदा लसीकरणाचा देखील तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे मुंबईतील तब्बल ३५ हून अधिक लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. यामध्ये चेंबूर परिसरातील सुश्रुत रुग्णालयाचा देखील समावेश आहे.

सुश्रुत रुग्णालयात अनेक नागरिक लसीकरणासाठी दाखल झाले होते. मात्र, रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर लस संपल्याचा बोर्ड लावण्यात आला होता. त्यामुळे अनेक नागरिकांना लस संपलेल्याचा बोर्ड पाहून घरी परतावे लागले. तसेच ज्यावेळी साठा उपलब्ध होईल त्यानंतर पुन्हा एकदा लसीकरणाला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले. मात्र, लसीचा साठा केव्हा उपलब्ध होणार, याची अद्यााप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा