Advertisement

मुंबई बंदरात ४ आलिशान क्रूझचं आगमन

समुद्री पर्यटनवाढीसाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट व नौकावहन मंत्रालयातर्फे मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत.

मुंबई बंदरात ४ आलिशान क्रूझचं आगमन
SHARES

समुद्री पर्यटनवाढीसाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट व नौकावहन मंत्रालयातर्फे मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. अशातच, मुंबई बंदरामध्ये ४ आलिशान प्रवासी जहाजांचं आगमन झालं आहे. एकाच वेळी या जहाज दाखल झाल्या असून, या जहांजांद्वारे तब्बल ६ हजार प्रवाशांनी मुंबई बंदरातून प्रवास केल्याचं समजतं.

जहाजानं प्रवास

मस्कत येथून मैन स्क्चीफ ६ हे जहाज अडीच हजार प्रवाशांना घेऊन आलं होतं. गोव्याहून आलेल्या कर्णिका जहाजामधून ८०० प्रवाशी आले होते. मस्कत येथून ५७० प्रवाशांना घेऊन आलेले सिल्व्हर स्पिरीट व गोव्याहून १२४ प्रवासी घेऊन आलेले आंग्रिया जहाज अशी ४ आलिशान जहाजे मुंबई बंदरात दाखल झाली. या ४ जहाजांमधून कर्णिकाच्या पुढील प्रवासासाठी १७०० प्रवाशांनी आरक्षण केलं. आंग्रियाच्या प्रवासासाठी १३६ प्रवाशांनी आरक्षण केलं. तसंच, सिल्व्हर स्पिरीटच्या प्रवासासाठी ५०० प्रवाशांनी आरक्षण केलं होतं. या माध्यमातून सुमारे ४ हजार प्रवाशांनी प्रत्यक्ष प्रवास केला, तर ६ हजारपेक्षा जास्त प्रवाशांनी मुंबई बंदराचा वापर केला.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा

मुंबई बंदरात येणाऱ्या भारतीय व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी ४ लाख चौरस फुटांचं आलिशान व भव्य आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल उभारण्यात येत आहे. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत या क्रुझ टर्मिनलचं काम पूर्ण होऊन ही सुविधा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे देण्यात आली.

क्रुझच्या संख्येत वाढ

मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे क्रुझ पर्यटनाला अधिकाधिक सुविधा पुरवण्यात येत असून, मागील ३ वर्षांत क्रुझद्वारे पर्यटनाला जाणाऱ्या व मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या आणि क्रुझच्या संख्येतही वाढ होत आहे. त्याशिवाय, आगामी काळात यामध्ये आणखी वाढ होईल व मियामी या क्रुझ पर्यटनाच्या जागतिक राजधानीप्रमाणे मुंबईलादेखील महत्त्वाचे स्थान मिळेल, असं मत मुंबई पोर्ट ट्रस्टकडून व्यक्त करण्यात आलं.



हेही वाचा -

तारापोरवाला मत्स्यालयात मासे कमी, पर्यटक नाराज

इकबाल मिर्चीच्या संपत्तीच्या लिलावास तुर्तास स्थगिती



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा