Advertisement

तारापोरवाला मत्स्यालयात मासे कमी, पर्यटक नाराज

तारापोरवाला मत्स्यालयात मागील अनेक महिन्यांपासून नवीन मासे पाहायला मिळत नसल्याची माहिती समोर येत आहे.

तारापोरवाला मत्स्यालयात मासे कमी, पर्यटक नाराज
SHARES

मुंबईसह राज्यभरातील मत्स्यालयात समुद्रातील मासे पाहायला अनेकजण मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांचीही मत्स्यालयात गर्दी असते. परंतु, तारापोरवाला मत्स्यालयात मागील अनेक महिन्यांपासून नवीन मासे पाहायला मिळत नसल्याची माहिती समोर येत आहे. तारापोरवाला मत्स्यालयात ऑक्टोपस, बॉटम शार्क, स्टारफिश यांसारखे ५० प्रकारचे समुद्री जीव पर्यटकांना बघायला मिळणार होते. मात्र, काही समुद्री जीव अजूनही मत्स्यालयात दाखल झाले नाहीत. त्यामुळं पर्यटकांनी अजून किती दिवस प्रतीक्षा करावी?, असा सवाल पर्यटक करत आहेत.

तिकीटनुसार मासे नाहीत

तारापोरवाला मत्स्यालयालयाच्या तिकीटनुसार मासे पाहायला मिळत नसल्याचं पर्यटकांचं म्हणणं आहे. या मत्स्यालयात प्रवेशासाठी प्रत्येकी व्यक्तीमागे ६० रुपये तर लहान मुलांसाठी ३० रुपये प्रमाणे तिकीट दर आकारले जातात. लहान मुलांना समुद्रातील माशांबद्दल खूपच वेड असते. त्यामुळं मुंबई, ठाणे व नवी मुंबई येथून पर्यटक बच्चेकंपनी सोबत मत्स्यालयाला भेटी देतात.

पर्यटकांची मागणी

महाविद्यालयीन विद्यार्थी देखील मोठ्या संख्येनं मत्स्यालयात येतात. परंतु चांगले मासेच पाहायला मिळत नसल्यानं ते समोरील समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारण्यास पसंती देत आहेत. आॅक्टोपस बघण्याकरिता मत्स्यालयाकडे पर्यटकांची वारंवार मागणी सुरू आहे.हेही वाचा -

बेस्टचे नुकसान शिवसेनेमुळेच, भाजपच्या सदस्यांची टीका

मुंबईत रस्ते अपघातांत 'इतक्या' जणांचा मृत्यूसंबंधित विषय