Advertisement

मुंबईत रस्ते अपघातांत 'इतक्या' जणांचा मृत्यू

मुंबईत वाहनांची संख्या दिवसेंदिवस जास्तच वाढत चालली आहे.

मुंबईत रस्ते अपघातांत 'इतक्या' जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत वाहनांची संख्या दिवसेंदिवस जास्तच वाढत चालली आहे. वाढत्या वाहनांमुळं अनेक महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुककोंडी निर्माण होत आहे. या वाहतुककोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहेत. तसंच, वाढत्या वाहनांच्या संख्येमुळं अपघातांचे प्रमाणही वाढलं आहे. मुंबईत रस्ते अपघातांमध्ये २०१८ (जानेवारी ते ऑक्टोबर) आणि २०१९ मध्ये ४ हजार ९६७ अपघातांमध्ये ७१५ जणांचा मृत्यू झाला आहे.

अपघातात वाढ

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अपघात व मृत्यूंचं प्रमाण पाहता त्यात घट झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. दारू पिऊन आणि बेदरकारपणे वाहन चालवणं, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणं इत्यादी कारणांमुळं रस्ते अपघातांचं प्रमाण वाढतं आहे. या अपघातांमध्ये फारशी घट झालेली दिसून येत नाही. ३० टक्के प्राणांतिक अपघात तर भरधाव वेगानं वाहन चालवल्यानंही होत आहेत.

पोलिसांकडून जनजागृती

अपघात कमी करण्यासाठी विविध प्रकारे पोलिसांकडून जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद वाहनचालकांकडून मिळत नाही आहे. त्यामुळं अपघातांची परिस्थिती जैसे थेच आहे. मुंबईत होणाऱ्या अपघातांमध्ये पादचाऱ्यांचाही समावेश अधिक आहे.



हेही वाचा -

भाजपकडून पवारांना ‘राष्ट्रपती पदा’ची आॅफर ?

अंधेरीत जलवाहिनी फुटली, स्थानिकांची गैरसोय



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा