Advertisement

बेस्टचे नुकसान शिवसेनेमुळेच, भाजपच्या सदस्यांची टीका

'बेस्टमध्ये शिवसेनेचं वर्चव्स असतानाही बेस्टचं कोणतंही भलं झालेलं नाही', असा आरोप भाजपच्या सदस्यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत शिवसेनेवर टीका केली.

बेस्टचे नुकसान शिवसेनेमुळेच, भाजपच्या सदस्यांची टीका
SHARES

'बेस्टमध्ये शिवसेनेचं वर्चव्स असतानाही बेस्टचं कोणतंही भलं झालेलं नाही', असा आरोप भाजपच्या सदस्यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत शिवसेनेवर टीका केली. मंगळवारी बेस्ट समितीची बैठक झाली. या बैठकीत बेस्टच्या अर्थसंकल्पाबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेवेळी भाजपच्या सदस्यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे.

शिवसेनाच कारणीभूत

या टीकाटीप्पणीनंतर बेस्टमध्ये भाजप आणि सेनेमधील संघर्ष टिपेला जाण्याचीही भीती व्यक्त करण्यात येत होती. मुंबई महापालिकेनं बेस्ट उपक्रमास आर्थिक मदत केली आहे. मात्र, अस असतानाही बेस्टची आर्थिक स्थिती बिघडवण्यास शिवसेनाच कारणीभूत असल्याचा आरोप भाजपच्या सदस्यांनी केला. बेस्टला २,१३६ कोटी रुपये अनुदानाच्या रूपात मिळाले आहे. परंतु, हा अर्थसंकल्प वाचल्यानंतर मुंबईकरांचा अपेक्षाभंग झाल्याचं मत भाजपच्या सदस्यांनी बैठकीत मांडली.

हेही वाचा - बेस्ट बस वेळेत नाही, प्रवाशांच्या अडचणीत वाढ

बेस्ट भंगारात

बेस्ट अजूनही महापालिकेवर अवलंबून राहणार असल्यास बेस्ट भंगारात जाण्याची वेळ येईल, अशी टीकाही करण्यात आली. महापालिकेनं सुमारे २२०० कोटी रुपयांची मदत केल्यानंतर, कर्जासाठी अनुदान दिल्यानंतर बेस्ट कर्जमुक्त होईल, असं म्हटलं जात आहे. दरम्यान, बेस्ट अजूनही महापालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानावर अवलंबून आहे.

हेही वाचा - मुंबईतील उड्डाणपूलं बेस्ट बससाठी खुली करण्याची 'या' संस्थेची मागणी

मोठा तोटा 

एका वर्षात सुमारे १२०० कोटी रुपये महापालिकेकडून बेस्टला मिळतील. तरीही तोट्यात असलेल्या बेस्टला २२०० कोटी रुपयांमधून १२०० कोटी रुपये वजा केल्यानंतरही १ हजार कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. त्यामुळं बस भंगारात काढण्याची वेळ येईल. या सर्व परिस्थितीला शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप भाजपच्या सदस्यांनी केला.



हेही वाचा -

मुंबई-पुणेदरम्यान तिसरी मार्गिका, घाटप्रवास होणार सुखद!

मुंबईत रस्ते अपघातांत 'इतक्या' जणांचा मृत्यू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा