Advertisement

मुंबईतील 'इतके' खासगी लसीकरण केंद्र बंद

मुंबईतील ७३ पैकी ४० खासगी लसीकरण केंद्रांमधील लसीकरण लससाठ्याअभावी गुरुवारी बंद ठेवण्यात आले आहे.

मुंबईतील 'इतके' खासगी लसीकरण केंद्र बंद
SHARES

मुंबईतील ७३ पैकी ४० खासगी लसीकरण केंद्रांमधील लसीकरण लससाठ्याअभावी गुरुवारी बंद ठेवण्यात आले आहे. उर्वरित ३३ खासगी केंद्रांमध्ये मर्यादित लससाठा उपलब्ध असून दुसरी मात्रा घेणाऱ्या नागरिकांना तेथे प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. तसेच लससाठा नसल्याने शासकीय आणि पालिकेची काही लसीकरण केंद्रे गुरुवारी बंद ठेवावी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी रात्री लससाठा उपलब्ध झाल्यास शासकीय व पालिकेच्या केंद्रांवर गुरुवारी लसीकरण सुरू राहील.

मुंबईमधील शासन व महापालिकेच्या ६३, तर खासगी रुग्णालयातील ७३ अशा एकूण १३६ लसीकरण केंद्रांमध्ये नागरिकांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात येत आहे. लशीचा साठा मर्यादित स्वरूपात प्राप्त होत असल्यामुळे काही लसीकरण केंद्रे तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवावी लागत आहेत. त्यामुळे लशीची दुसरी मात्रा घेणाऱ्यांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त आहे. ही बाब लक्षात घेऊन लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात येत आहे.

मुंबईतील लसीकरण मोहीम अखंडपणे सुरू राहावी यासाठी आवश्यक लससाठा उपलब्ध करून देण्याकरता पालिका प्रशासन केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्यानुसार बुधवार, २८ एप्रिल रोजी उशिरापर्यंत सरकारकडून काही प्रमाणात लससाठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. लससाठा उपलब्ध झाल्यास गुरुवार, २९ एप्रिल रोजी तो वितरित करण्यात येईल. त्यानंतर शासकीय आणि पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

महापालिकेला २५ एप्रिल २०२१ पर्यंत एकूण २४ लाख ५८ हजार ६०० इतक्या लशी उपलब्ध झाल्या. पैकी २४ लाख १० हजार ८६० लशी उपयोगात आल्या. ४७ हजार ७४० इतका लससाठा बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत संबंधित केंद्रांवर शिल्लक होता. लसीकरणाचा वेग लक्षात घेता हा लससाठा बुधवारीच संपेल. लससाठ्याची उपलब्धता लक्षात घेत ४० खासगी लसीकरण केंद्र गुरुवारी बंद ठेवण्यात येणार आहेत. तर उर्वरित ३३ केंद्रांवर साठा उपलब्ध असेपर्यंत दुसरी मात्रा घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. तसेच गुरुवारी लससाठा उपलब्ध झाल्यास गुरुवारी शासकीय आणि पालिकेची लसीकरण केंद्रे सुरू राहतील, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले.

पालिकेला २५ एप्रिल २०२१ पर्यंत एकूण २४ लाख ५८ हजार ६०० इतक्या लशी उपलब्ध झाल्या. पैकी २४ लाख १० हजार ८६० लशी उपयोगात आल्या. ४७ हजार ७४० इतका लससाठा बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत संबंधित केंद्रांवर शिल्लक होता. तो बुधवारीच संपणार असल्याने ४० केंद्र बंद ठेवण्यात येणार आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा