Advertisement

ठाण्यात धोकादायक, अतिधोकादायक इमारतींची 'इतकी' संख्या

पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून जीवितहानी होते. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळ्याआधी इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येते.

ठाण्यात धोकादायक, अतिधोकादायक इमारतींची 'इतकी' संख्या
SHARES

ठाणे महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. यानुसार ठाणे शहरात ७७ अतिधोकादायक तर ४२२६ धोकादायक इमारती आहेत. शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रामध्ये सर्वाधिक ३७ अतिधोकादायक इमारती आहेत. तर वागळे इस्टेटमध्य १,०८१ तर मुंब्य्रात १,४१६ धोकादायक इमारती आहेत. 

पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून जीवितहानी होते. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळ्याआधी इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येते. प्रभाग समितीनिहाय हे सर्वेक्षण केलं जात. त्यानुसार अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची यादी  जाहीर करण्यात येते. यामधी अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून जमीनदोस्त करण्यात येतात. तर धोकादायक इमारती रिकाम्या केल्या जातात. 

ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचे सी-१, सी-२ ए, सी-२ बी आणि सी-३ अशा चार टप्प्यांत वर्गीकरण केले आहे. सी-१ म्हणजे राहण्यास अयोग्य आणि तात्काळ निष्कासित करावी लागणारी अतिधोकादायक इमारत, सी-२ ए म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे, सी-२ बी म्हणजे इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करणे आणि सी-३ म्हणजे इमारतींची किरकोळ दुरुस्ती करणे.



हेही वाचा -

अंधेरी बनला कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

मुख्यमंत्र्यांच्या 'मातोश्री' परिसरात कोरोनाचा शिरकाव

Cops Track Down 44 ‘Missing’ Covid Patients : ‘त्या’ बेपत्ता रुग्णांना शोधण्यात यश




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा