Advertisement

मुंबईत शुक्रवारी ४३४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे.

मुंबईत शुक्रवारी ४३४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यू
SHARES

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ४३४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत ७,१३,९९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्के झाला आहे. मागील २४ तासात मुंबईत एकूण ४० हजार ४४३ नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली.

मुंबईत गेल्या २४ तासात ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ४ हजार ६५८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर १ हजार २८९ दिवसांवर गेला आहे. मुंबईतील सध्या ३८ इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन शून्य आहेत.

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. शहरात करण्यात आलेल्या पाचव्या सेरो सर्वेत ८६ टक्के लोकांमध्ये कोरोना विरोधातील अँटीबॉडीज आढळल्या आहेत. यातील काही लोकांनी व्हॅक्सिन घेतलं होतं. लस घेतलेल्या ९० टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या. तर काहींनी व्हॅक्सिन घेतलेलं नव्हतं अशा ८० टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत.

या सर्वेत २४ वॉर्डमध्ये ८ हजार ६०० रक्ताचे नमुने तपासण्यात आले आहे. सर्वेत समोर आलेल्या माहितीनुसार अँटीबॉडीज मिळण्याचं प्रमाण स्त्री-पुरुषांमध्ये समसमान आहे. वयोगटानुसार १८ वर इक्वल डिस्ट्रिब्युशन आहे. झोपडपट्ट्या आणि इमारतीत जास्त फरक नाही.

दरम्यान, जिनोम सॅम्पल - दोन सॅम्पल डेटा गेला होता. यात एकही रुग्ण डेल्टा प्लसचा नाही. ६०-७० टक्के डेल्टाचे रुग्ण आढळत आहेत. अशावेळी सतर्क असणं आवश्यक आहे. पालिकेकडून सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.



हेही वाचा

८६.६४ टक्के मुंबईकरांमध्ये आढळल्या कोविड –१९ अँटीबॉडीज

पहिल्या, दुसऱ्या डोसनंतरही होतोय कोरोना

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा