Advertisement

८६.६४ टक्के मुंबईकरांमध्ये आढळल्या कोविड –१९ अँटीबॉडीज

पालिकेनं केलेल्या सेरो सर्व्हेचा अहवाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे.

८६.६४ टक्के मुंबईकरांमध्ये आढळल्या कोविड –१९ अँटीबॉडीज
SHARES

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता महापालिकेनं सर्व वयोगटातील नागरिकांच्या शरीरातील अँटीबॉडीज तपासण्यासाठी पाचवा सेरो सर्व्हे केला होता. या सर्व्हेचा अहवाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. या अहवालात ८६.६४ टक्के मुंबईकर नागरिकांमध्ये कोविड-१९ अँटीबॉडीज आढळले.

कोविडच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात केलेल्‍या पाचव्या सेरो सर्वेक्षणातील निष्‍कर्ष जाहीर करण्यात आले आहेत.

पूर्ण किंवा अंशतः लसीकरण झालेल्‍यांपैकी ९०.२६ टक्‍के नागरिकांमध्‍ये अँटीबॉडीज आढळली. तर लसीकरण न झालेल्‍यांपैकी ७९.८६ टक्‍के नागरिकांमध्‍ये अँटीबॉडीज आढळली. मागील सर्वेक्षणांच्‍या तुलनेत झोपडपट्टी तसंच बिगर झोपडपट्टी परिसरांमध्‍ये अँटीबॉडीज आढळण्‍याचं प्रमाण वाढलं आहे.

अँटीबॉडीज आढळले असले तरी, मास्‍कचा उपयोग, हातांची स्‍वच्‍छता आणि सुरक्षित अंतर इत्‍यादी खबरदारी बाळगणे आवश्‍यकच आहे. कोविड-19 विषाणू संसर्गजन्य साथरोगाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे महानगरपालिका क्षेत्रात पाचवे सेरो सर्वेक्षण करण्यात आले.

अर्थात रक्‍त नमुन्‍यांची चाचणी करून अँटीबॉडीज शोधण्‍याबाबतचे सर्वेक्षण करण्‍यात आले. सर्वेक्षणानुसार, एकूण ८६.६४ टक्‍के नागरिकांमध्‍ये अँटीबॉडीज अस्‍त‍ित्‍व दिसून आले आहे.

लस घेतलेल्या ९० टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या तर काहींनी व्हॅक्सिन घेतलेलं नव्हतं अशा ८० टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. या सर्वेत २४ वॉर्डमध्ये ८ हजार ६०० रक्ताचे नमुने तपासण्यात आले आहेत.

सर्वेत समोर आलेल्या माहितीनुसार अँटीबॉडीज मिळण्याचं प्रमाण स्त्री-पुरुषांमध्ये समसमान आहे. वयोगटानुसार १८ वर इक्वल डिस्ट्रिब्युशन आहे. झोपडपट्ट्या आणि इमारतीत जास्त फरक नाही. दरम्यान असं जरी असलं तरी नियमांचे पालन केलं पाहिजे, असं आरोग्य विभागानं म्हटलं आहे.

पहिला, दुसरा आणि तिसऱ्या सेरो सर्वेत आणि बालकांच्या सेरो सर्वेत झोपडपट्ट्यात कमी असणार वेग वाढत गेला. इमारतीत देखील आधी १६ टक्के होता मग २८ टक्केपर्यंत गेला होता.

बालकांमध्ये ५१ टक्के मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. सर्वे करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे, की कोव्हिड अॅप्रोप्रिएट बिहेविअरचं पालन करणं गरजेचं आहे.

दरम्यान, जिनोम सॅम्पल - दोन सॅम्पल डेटा गेला होता. यात एकही रुग्ण डेल्टा प्लसचा नाही. ६०-७० टक्के डेल्टाचे रुग्ण आढळत आहेत. अशावेळी सतर्क असणं आवश्यक आहे. पालिकेकडून सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.



हेही वाचा

डेल्टा वेरिएंटचा वाढता धोका, जिनोम सिक्वेंसिंगमधून सापडले 'इतके' रुग्ण

पहिल्या, दुसऱ्या डोसनंतरही होतोय कोरोना

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा