Advertisement

बँकांचे कामकाज आठवड्याचे 5 दिवस सुरू राहणार?

कामाचे तास बदलतील

बँकांचे कामकाज आठवड्याचे 5 दिवस सुरू राहणार?
file photo
SHARES

देशभरातील बँक कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच देशातील सर्व बँका पाच दिवसांचा आठवडा लागू करू शकतील. यासंदर्भातील हालचाली तीव्र झाल्या असून लवकरच हा प्रस्ताव केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे.

सध्या भारतीय बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी काम करत नाहीत. मात्र नवीन धोरण लागू झाल्यावर सर्व शनिवारी बँका बंद राहणार आहेत.

बँक कर्मचारी संघटनांनी ५ दिवसांचा आठवडा करण्याची मागणी केली आहे. 28 जुलै रोजी झालेल्या इंडियन बँक्स असोसिएशनच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली आणि ती मान्यही करण्यात आली. भारतातील सर्व बँकांसाठी 5 दिवसांचा आठवडा लागू होण्याची दाट शक्यता आहे. देशातील बँक कर्मचारी संघटनांची संघटना असलेल्या इंडियन बँक असोसिएशनने १५ दिवस काम करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव लवकरच अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाणार आहे.

या प्रस्तावाला अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिल्यास सर्व शनिवारी बँकांना सुट्टी मिळणार आहे. म्हणजेच आता चार आठवड्यांचा महिना असताना बँक कर्मचाऱ्यांना एका महिन्यात आठ सुट्या मिळणार आहेत. सध्या सर्व बँका पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी काम करतात. मात्र नवीन धोरणानुसार सर्व शनिवारी बँका बंद राहणार आहेत.

हा प्रस्ताव मंजूर होईल, असा विश्वास इंडियन बँक्स असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने सांगितले की, या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिल्यास एकूण कामकाजाचा कालावधी 40 मिनिटांनी वाढू शकतो, त्यापैकी रोख व्यवहाराचा कालावधी सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत असेल, रोख व्यवहारानंतर बँक दुपारी 4.30 वाजेपर्यंत काम करत राहिल."

कामाचे तास बदलतील

सध्या कॉर्पोरेट क्षेत्रातील नियमांनुसार 5 दिवसांचा आठवडा असेल तर 8 ऐवजी 9 तास काम करावे लागते. देशातील सर्व बँकांवर समान धोरण लागू करण्याचा मानस आहे. म्हणजेच बँका फक्त ५ दिवस उघड्या राहिल्या तर बँकांच्या कामाचे तास वाढतील.

आता बँक कर्मचारी एका महिन्यात 2 आठवड्यांच्या सुट्टीसह 8 तासांच्या शिफ्टमध्ये काम करतात. मात्र पाच दिवसांचा आठवडा सुरू झाल्यानंतर हे सूत्रही बदलणार आहे. बँकांना त्यांच्या ग्राहक सेवेचे तास दररोज ४५ मिनिटांनी वाढवण्यास सांगण्यात येत आहे.



हेही वाचा

मुंबई विमानतळावर पहिले ड्राइव्ह-थ्रू मॅकडोनाल्ड्स रेस्टॉरंट सुरू

मुंबईकरांना झटका! आजपासून मालमत्तेचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन महागणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा