Advertisement

मुंबईकरांना झटका! आजपासून मालमत्तेचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन महागणार

काय असेल नवं शुल्क? जाणून घ्या

मुंबईकरांना झटका! आजपासून मालमत्तेचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन महागणार
SHARES

आजपासून मालमत्तेची ऑनलाइन नोंदणी महाग होणार आहे. आता यापुढे ऑनलाइन सेवेसाठी ग्राहकांकडून अतिरिक्त शुक्ल आकारण्यात येणार आहे.

डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी आत्तापर्यंत ही सेवा ग्राहकांना मोफत देण्यात येत होती. मात्र आता यापुढे मुंबईकरांना ई-नोंदणीसाठी अतिरिक्त 1,000 रुपये द्यावे लागणार आहेत. याशिवाय नोंदणी विभागाने ई-फायलिंग सेवा, रजा आणि परवाना करारासाठीही अतिरिक्त 300 रुपये घेणार आहेत. (mumbai property registration cost increase)

नोंदणी विभाग ही रक्कम ग्राहकांकडून दस्तऐवजीकरण शुल्क म्हणून आकारणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

कोरोनाच्या काळात नोंदणी कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी विभागाने ई-नोंदणी सेवा मोफत सुरु केली होती. या प्रक्रियेमुळे मुंबईकरांना प्रत्यक्ष जाऊन व्यवहार करण्याची गरज उरली नाही. कारण नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन होत आहे.

अगदी सर्व नामांकित बांधकाम व्यावसासिकांनीही आपल्या ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचतोय. 

नवं शुक्ल काय आहे?

ई-फायलिंग सेवा: रु. 300

रजा आणि परवाना करार: रु. 300

ई-नोंदणी सेवा: रु. 1000हेही वाचा

मुंबईतही रायगडप्रमाणे दरड कोसळण्याचा धोका! बेकायदा बांधकामांमुळे लँडस्लाईड

पुणे-मुंबई प्रवास आता अधिक वेगवान, नवीन दोन लेन तयार होणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा