Advertisement

वाहतूककोंडीत अडकून ५० वर्षीय रुग्णाचा मृत्यू


वाहतूककोंडीत अडकून ५० वर्षीय रुग्णाचा मृत्यू
SHARES

मुंबईतील मरोळ नाका परिसरात वाहतूककोंडीमध्ये अडकून एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मोहम्मद अक्रम खान (५०) असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. मोहम्मद खान उपचारासाठी रिक्षानं रुग्णालयात जात असताना मरोळ नाका रस्त्यावरील वाहतूककोंडीमध्ये तब्बल ४५ मिनिटं अडकले. परिणामी मोहम्मद यांना रुग्णालयात वेळेत जाता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला.


नेमकं काय घडलं?

मोहम्मद अक्रम खान हे मरोळ नाका परिसरात रहात होते. मोहम्मद यांना २५ ऑगस्ट रोजी रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळं त्यांच्या भावानं त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी रिक्षा केली होती. हे रुग्णालय मोहम्मद यांच्या घरापासून अगदी १० मिनिटांच्या अंतरावर आहे.


कुटुंबीयांचा आरोप

मोहम्मद यांना तातडीने रुग्णालयात नेता यावं म्हणून त्यांनी रिक्षा केली होती. मात्र, ही रिक्षा वाहतूककोंडीत अडकल्यामुळं मोहम्मद यांना आपला जीव गमवावा लागला, असा आरोप मोहम्मद यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.हेही वाचा-

म्हणून पुणे पोलिसांची विविध ठिकाणी छापेमारी

महिलेची बॅग चोरणारा पोलिसांच्या तावडीतRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा