म्हणून पुणे पोलिसांची विविध ठिकाणी छापेमारी

पुणे पोलिसांनी मुंबई, हैदराबाद, छत्तीसगड येथे काही संशयितांच्या घरी छापे मारले. नक्षलवाद्यांना होत असलेल्या मदतीच्या संशयातून ही छापेमारी केली जात असल्याचं बोललं जातं.

म्हणून पुणे पोलिसांची विविध ठिकाणी छापेमारी
SHARES

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी मुंबई, हैदराबाद, छत्तीसगड येथे काही संशयितांच्या घरी छापे मारले. नक्षलवाद्यांना होत असलेल्या मदतीच्या संशयातून ही छापेमारी केली जात असल्याचं बोललं जातं. एल्गार परिषदेत अटक केलेल्या आरोपी ज्या कुणाच्या सोशल मीडियाद्वारे संपर्कात होते, त्यांच्या घरावरही पोलिसांनी छापेमारी केली आहे.


आक्षेपार्ह कागदपत्रं हस्तगत

भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळेसह नागपुरातून वकील सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, शोमा सेन, आणि दिल्लीतून रोना विल्सन यांना अटक केली होती. अटकेनंतर पोलिसांनी या आरोपींच्या घरावर छापे मारत मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह कागदपत्रे आणि इतर साहित्य हस्तगत केली होती.

त्यावेळी आरोपी सीपीआय माओवादी या प्रतिसंबधित संघटनेसोबत घनिष्ठ संबध दर्शवणारे दस्तावेज प्राप्त झाले होते. या प्रकरणाचा पूर्ण छडा लावण्यासाठी पोलिसांनी पाचही आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या-ज्या व्यक्तीच्या संपर्कात होते. त्यांची पार्श्वभूमी पोलिसांनी तपासण्यास सुरुवात केली.


'यांच्या' घरावर कारवाई

हैदराबादमध्ये वारावर राव, मुंबईत अरुण फरेरा, वर्नोन गोनसाल्वीस, गोव्यात आनंद तेलतुंबडे, फरीदाबादमध्ये सुधा भारद्वाज आणि  नवी दिल्लीत गौतम नवलाखा यांच्यासोबत करण्यात आलेल्या ई-मेलवर आक्षेपार्ह गोष्टी मिळून आल्यानंतर पोलिसांनी कारवाईची भूमिका घेतली. त्यानुसार पुणे पोलिसांनी मंगळवारी सकाळी हैदराबादमध्ये वारावर राव, मुंबईत अरुण फरेरा, वर्नोन गोनसाल्वीस, गोव्यात आनंद तेलतुंबडे, छत्तीसगमध्ये सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा यांच्या घरावर कारवाई करत, काही महत्त्वाचे दस्तावजे ताब्यात घेतले आहेत.
एल्गार प्रकरणानंतर अटक करण्यात आलेल्या पाचही जणांनी केलेले सुमारे २०० ते २५० ई-मेल तपासल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचं बोलले जाते.


पोलिसांना 'यांच्या'वर संशय

मुंबईतून अटक केलेल्या अरुण फरेरा यांना यापूर्वीही कथित नक्षलवादी म्हणून अटक करण्यात आली होती. परंतु, काही दिवसांतच परेरा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. वर्नोन गोनसाल्वीस याने यापूर्वी ७ वर्षांची शिक्षा भोगली आहे.

वारावर राव हे विचारवंत आणि कवी असून शहरी नक्षलवादाचे 'थिंक टँक' असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गौतम नवलाखा हा कश्मीरमधील फुटिरतावादी आणि नक्षलवाद्यांमधील दुवा म्हणून काम करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शहरात नक्षलवादी चळवळ पसरवण्यात सुधा भारद्वाज यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


हेही वाचा - 

मुंबईला टार्गेट करण्यासाठी नक्षलवाद्यांची नवी खेळी!

कोरेगाव भीमा हिंसाचार : सुधीर ढवळेंसह तिघांना मुंबईतून अटक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा