रहिवाशांनी निवडला थेट 'नोटा' चा पर्याय

बोरीवली - 2012 च्या तुलनेत यंदा मुंबईमध्ये मतदानाचा टक्का बऱ्यापैकी वाढला. मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचं चित्र यावेळी पहायला मिळालं. बोरीवली पूर्वमधील ऋषीवन कॉलनीतील 'ला वेलेजा' आणि लाविस्ट इमारतीमध्ये राहणाऱ्या 500 कुटुंबांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. मात्र यंदा कोणत्याही पक्षाला मतदान न करता त्यांनी थेट 'नोटा'चा पर्याय निवडला. या कॉलनीत राहणारे रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. विकासकाने ताबा दिला, पण पाणी दिलं नसल्याचा आरोप इथल्या रहिवाशांनी केला आहे. विशेष म्हणजे 5 वर्ष होऊनही पालिकेनं दखल न घेतल्याने अखेर रहिवाशांनी थेट 'नोटा'चा पर्याय निवडला.

Loading Comments