Advertisement

दादर ते मुंबई कोस्टल रोडला भुयारी मार्गाद्वारे जोडणार

अंडरपासमुळे मुंबई कोस्टल रोडवर थेट प्रवेश मिळेल.

दादर ते मुंबई कोस्टल रोडला भुयारी मार्गाद्वारे जोडणार
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मे महिन्याच्या सुरुवातीला नवीन अंडरपास सुरू करण्याची तयारी करत आहे. हा अंडरपास 550 मीटर लांब आणि 11 मीटर रुंद आहे. दादर आणि प्रभादेवी भागातून येणाऱ्या वाहनांसाठी हा अंडरपास फायदेशीर ठरेल. अंडरपासमुळे मुंबई कोस्टल रोडवर थेट प्रवेश मिळेल.

10.58 किलोमीटर लांबीच्या मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातील हा अंडरपास एकमेव भुयारी मार्ग आहे. हा अंडरपास शिवडी-वरळी एलिव्हेटेड कॉरिडॉरला जोडतो. ही लिंक चालकांना मुंबईच्या दक्षिण किंवा पश्चिम भागात जलद पोहोचण्यास मदत करेल.

भुयारी मार्ग जो की कपूर चौकाला कोस्टल रोडशी जोडेल. खान अब्दुल गफ्फार खान रस्त्याच्या इथून हा मार्ग जाईल. तो थेट वरळी सी फेस येथील बिंदू माधव ठाकरे चौकातील वाहनांच्या इंटरचेंजला जोडेल.

सध्या, खालील कामे चालू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही कामे येत्या काही आठवड्यांत पूर्ण होतील. हा बोगदा कोस्टल रोडचा शेवटचा मिसिंग लिंक म्हणून काम करेल. 

एकदा का अंडरपास सुरू झाला मग दादरहून येणाऱ्या वाहनांना कोस्टल रोडवर जाण्यासाठी वरळी किंवा हाजी अली इंटरचेंजचा वापर करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे वरळीतील गर्दी कमी होईल. एकदा भुयारी मार्गात गेल्यावर, ड्रायव्हर मरीन ड्राइव्ह किंवा वांद्रेकडे जाण्याचा पर्याय निवडू शकतात.

सध्या मुंबईचा कोस्टल रोड पूर्णपणे कार्यरत आहे. दादर आणि प्रभादेवी येथून दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांनाच हा नवीन अंडरपास वापरण्याची परवानगी असेल.



हेही वाचा

शालेय विद्यार्थ्यांसाठी महापालिकेचा अनोखा उपक्रम

कोकण मार्गावरील प्रमुख तीन गाड्या शॉर्ट टर्मिनेट

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा