Advertisement

मालाडमधील ६ समुद्र चौपाट्यांना लाभला सोनेरी किनारा


मालाडमधील ६ समुद्र चौपाट्यांना लाभला सोनेरी किनारा
SHARES

मालाड पश्चिम येथील अक्सा, सिल्व्हर, दानापानी, एरंगळ, मार्वे आणि मनोरी या सर्व समुद्र चौपाटी दिव्यांनी उजळून निघाल्या आहेत. यासर्व चौपाट्यांवर एलईडी दिवे बसवण्याचं काम पूर्ण झालं असून आजवर अंधारात बुडालेल्या या चौपाट्यांना आता प्रकाशमय सोनेरी किनारा लाभली आहे.


सर्वच चौपाट्यांवर रोषणाई

मुंबई महापालिकेच्या हद्दीतील विविध सागरी किनाऱ्यांवरील सुशोभिकरणाचा भाग म्हणून त्याठिकाणी विद्युत रोषणाई करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्याअंतर्गत अक्सा, सिल्व्हर, दानापानी, एरंगळ, मार्वे आणि मनोरी येथील चौपाट्यांवर एलईडीचे विद्युत दिवे बसवण्याचं काम हाती घेतलं होतं. हे विद्युत रोषणाईचं काम पूर्ण झालं असून सर्वच चौपाट्या प्रकाशात न्हाऊन निघाल्या आहेत.

चौपाटीच्या सौंदर्यात भर

यासर्व चौपाट्यांवर ९ मीटर उंचीचे एकूण १९८ खांब बसवण्यात आले. महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली यांत्रिकी आणि विद्युत विभागाच्या प्रमुख अभियंत्यांनी हे काम यशस्वीपणे पूर्ण केलं आहे. यापूर्वी या चौपाट्यांवर दिवे नसल्यामुळे रात्रीच्यावेळी चौपाटीवर अंधाराचं राज्य होतं. परंतु, या एलईडी दिव्यांमुळे रात्रीसुद्धा शांत एलईडी दिव्यांनी प्रकाशमान झाल्या आहेत. शिवाय चौपाटीच्या सौंदर्यातही भर पडल्याचं महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

चौपाटीवर किती विद्युत दिव्यांचे खांब?

  • आक्सा : ५० खांब
  • सिल्व्हर : ४५ खांब
  • दानापानी : २२ खांब
  • एरंगळ : २० खांब
  • मार्वे  : १५ खांब
  • मनोरी : ४६ खांब

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा