Advertisement

मुंबईतील आगीला सदोष वायरिंग कारणीभूत- रणजीत पाटील

इलेक्ट्रिक साहित्य बनवणाऱ्या कंपन्यांकडून सदोष साहित्य पुरवण्यात आल्याने या घटना घडल्या आहेत. त्यामुळे यापुढे अशा घटनांसाठी निकृष्ट दर्जाचं साहित्य पाठवणार्‍या इलेक्ट्रिक साहित्य उत्पादक कंपन्यांच्या मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात येईल, अशी माहितीही पाटील यांनी दिली.

मुंबईतील आगीला सदोष वायरिंग कारणीभूत- रणजीत पाटील
SHARES

मागच्या काही वर्षांमध्ये मुंबईत आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असून या घटनांमध्ये अनेक मुंबईकरांनी आपले प्राणही गमावले आहेत. यापैकी ६९ टक्के आगीच्या घटना चुकीची वायरिंग केल्यामुळे घडत असल्याची माहिती शहरी विकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधानसभेत दिली.


सदोष साहित्य

इलेक्ट्रिक साहित्य बनवणाऱ्या कंपन्यांकडून सदोष साहित्य पुरवण्यात आल्याने या घटना घडल्या आहेत. त्यामुळे यापुढे अशा घटनांसाठी निकृष्ट दर्जाचं साहित्य पाठवणार्‍या इलेक्ट्रिक साहित्य उत्पादक कंपन्यांच्या मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात येईल, अशी माहितीही पाटील यांनी दिली. आमदार अमित साटम, अतुल भातखळकर यांसह इतर आमदारांनी यासंदर्भातील लक्षवेधी मांडली होती.


६०९ जणांचा मृत्यू

मुंबई शहरात २००८ ते २०१८ अशा १० वर्षांमध्ये ४९ हजार ३९१ आगीच्या घटना घडल्या. त्यापैकी ३३ हजार ९४६ शॉर्टसर्किटच्या घटना म्हणजेच ६९ टक्के सदोष वायरिंगमुळे घडल्या आहेत. तर, गॅस गळतीमुळे मुंबईत १ हजार ११६ आगीच्या घटना आणि अन्य कारणांमुळे १४ हजार ३२९ आगीच्या घटना घडलेल्या आहेत. आगीच्या या दुर्घटनांमध्ये ६०९ व्यक्तींचा आणि ७ अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ११०.४२ कोटी रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली आहे.


झोपड्यांना आग

आगीच्या दुर्घटनांमध्ये ३ हजार १५१ वेळा झोपडपट्ट्यांना आग लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. झोपडपट्टी अथवा गजबजलेल्या ठिकाणी लागणारी आग त्वरीत विझवण्यासाठी महापालिकेतर्फे १७ छोटी अग्निशमन केंद्रे उभारण्यात येत असून त्यांपैकी ११ ठिकाणी अग्निशमन केंद्र कार्यान्वित झालेली आहेत.



हेही वाचा-

खा. श्रीकांत शिंदेंनी लावलेल्या खुंटवलीतील झाडांनाही आग

कमला मिल आग: महापालिकेला अहवाल सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा