SHARE

मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदासाठी अखेर ७ उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली आहे. लोकसेवा आयोगामार्फत निवड करण्यात आलेल्या सातही सहाय्यक आयुक्तपदाच्या उमेदवारांवर आता महापालिकेच्या कामकाजाचा भार सोपवला जाणार आहे.


काही सहाय्यक आयुक्तपदं रिक्त

मागील अनेक महिन्यांपासून लोकसेवा आयोगाकडून अंतिम यादी बनवली जात नसल्यामुळे कार्यकारी अभियंत्यांची प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. तर काही विभागांची सहाय्यक आयुक्तपदे रिक्त ठेवण्यात आली होती. लोकसेवा आयोगाने सहाय्यक आयुक्तपदासाठी निवड केलेल्या या ७ उमेदवारांमध्ये नितीन नारायण काटेकर, विनायक वसंतराव विसपुते, मनिष राधाकृष्ण वळंजू, सखाराम छत्रू चव्हा्ण, स्वप्नमजा श्रीमंत क्षीरसागर, श्वे्ताबंरी वसंतराव भोसले व गजानन विनायक बेलाले आदींचा समावेश आहे.


दोघा सहाय्यक आयुक्तांना बढती 

उच्च न्याायालयाने २८ जून, २०१८ रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने व त्यामधील अटींच्या अधीन राहून आणि उपरोक्त याचिकांच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून ७ उमेदवारांची मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदाकरिता ही निवड केली आहे. विश्वास शंकरवार आणि हर्षद काळे या दोघा सहाय्यक आयुक्तांना बढती देऊन त्यांना उपायुक्त बनवले आहे. त्यामुळे ही दोन पदे रिक्त असून बी विभागाचे सहायक आयुक्त उदयकुमार शिरुरकर आणि ई विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव गायकवाड हे सेवानिवृत्त झाले आहे.  त्यामुळे सध्या बी विभाग, सी विभाग आणि ई विभागासह अनेक विभागांच्या सहाय्यक आयुक्तांची पदे रिक्त आहेत. या पदांवर या सर्वांना सामावून घेतलं जाणार आहे.हेही वाचा -

जेईई, नीट परीक्षा वर्षांतून दोनदा

अंधेरी दुर्घटनेतील जखमी अस्मिता काटकर यांचा मृत्यू 

संबंधित विषय
ताज्या बातम्या