Advertisement

जेईई, नीट परीक्षा वर्षांतून दोनदा


जेईई, नीट परीक्षा वर्षांतून दोनदा
SHARES

वैद्यकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठीची जेईई परीक्षा आता वर्षातून दोन वेळेस होणार आहे. नीट परीक्षा फेब्रुवारी आणि मे मध्ये तर जेईई परीक्षा जानेवारी आणि एप्रिलमध्ये होईल, अशी घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी केली.


नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून अायोजन

नीट आणि जेईई परीक्षांचे आयोजन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) केले जाते. आत नॅशनल टेस्टींग एजन्सींकडून या दोन्ही परीक्षांचं आयोजन केलं जाईल. विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा नीट परीक्षा देता येणार आहे. या दोन परीक्षेपैकी ज्यात सर्वाधिक गुण असेल त्या परीक्षेचे गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील. दुसऱ्या टप्प्यातील नीटच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यासाठी विद्यार्थी ८ जुलैपर्यंत अर्ज करू शकतात. दुसऱ्य़ा टप्प्यातील प्रवेश निवडीची यादी १२ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल. एकदा दुसऱ्या टप्प्यात प्रवेश प्रक्रिया निश्चित झाल्यानंतर त्याला प्रवेश नाकारता येणार नाही.



हेही वाचा -

शिक्षक भरतीसाठी पवित्र वेबपोर्टल सुरू

शिक्षक पात्रता परीक्षा १५ जुलैला




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा