उल्हासनगर शहरातील एका नामांकित शाळेतील पि.टी. शिक्षकांनी एका सात वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. या प्रकरणी हिल लाईन पोलिसांनी तताडीनं शिक्षकावर पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार या पि.टी. शिक्षकानं सात वर्षीय मुलीला 'मला मिठी मार, माझी पप्पी घे नाहीतर तुला मारेल...' असं बोलत धमकावलं. इतक्यावर न थांबता त्यानं या मुलीचं गालावर चुंबन घेऊन तिचा विनयभंग केला.
घडल्या प्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पि.टी. शिक्षकाला अटक केली. विद्येच्या मंदिरात घडलेल्या या किसळवाण्या प्रकाराविषयी आता अनेक वर्गांतून संताप व्यक्त केला जात असून, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
राज्यात बदलापूर येथील घटना घडल्यावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात होता. नागरिकांनी बदलापूर बंद करत हिंसक आंदोलन केले होते. या घटनेनंतर देखील राज्यात महिला आणि मुलींवरील अत्याचार सुरूच आहेत.
उल्हासनगर येथील एका शाळेत एका शिक्षकाने शाळेतील एका मुलीवर अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. पीडित मुलीने ही बाब घरी सांगितल्यावर तिच्या पालकांनी शिक्षकाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर या शिक्षकाला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उल्हासनगर हिल लाईन पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा