Advertisement

महाराष्ट्रात पावणे नऊ कोटी मतदार; तर सर्वाधिक मतदार ठाण्यात

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर सर्वाधिक मतदार ठाणे जिल्ह्यात असणार आहेत.

महाराष्ट्रात पावणे नऊ कोटी मतदार; तर सर्वाधिक मतदार ठाण्यात
SHARES

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर सर्वाधिक मतदार ठाणे जिल्ह्यात असणार आहेत. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुरूषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक असून १४ लाख ४० हजार एकूण मतदारांमध्ये ७ लाख ३५ हजार ५९७ महिला मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ठाणे मतदारसंघात राज्यात सर्वाधिक सुमारे २३ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.


९ मतदारसंघ राखीव

राज्यातील नंदूरबार, गडचिरोली-चिमूर, दिंडोरी, पालघर हे ४ मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असून अमरावती, रामटेक, शिर्डी, लातूर आणि सोलापूर हे ५ मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.


मावळमध्ये २२ लाख मतदार

मावळ मतदारसंघात सुमारे २२ लाखांहून अधिक, तर शिरूरमध्ये आणि नागपूरमध्ये प्रत्येकी २१ लाखांहून अधिक तर पुणे आणि बारामतीमध्ये प्रत्येकी २० लाखांहून अधिक मतदार आहेत. तर मुंबईतील मुंबई-उत्तर मतदारसंघात १६ लाखांहून अधिक मतदार असून मुंबई-उत्तर दक्षिण मतदारसंघात १६ लाख ९८ हजार मतदार आहेत. तर मुंबई-उत्तर पूर्व मतदारसंघात १५ लाख ५८ हजार मतदार आहेत. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात १६ लाख ४८ हजार आणि मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात १४ लाख १५ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर पालघरमध्ये १८ लाख १३ हजार, भिवंडीत १८ लाख ५८ हजार आणि कल्याणमध्ये १९ लाख २७ हजार मतदार मतदान करतील.



हेही वाचा -

आगे आगे देखो होता है क्या; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना सूचक विधान

राजीनामा दिलाच नाही; विखे-पाटील यांचं स्पष्टीकरण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा