आगे आगे देखो होता है क्या; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना सूचक विधान

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील दिग्गज नेते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं सुतोवाच करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगे आगे देखो होता है क्या असं सुचक विधान केलं.

SHARE

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील दिग्गज नेते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं सुतोवाच करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'आगे आगे देखो होता है क्या' असं सूचक विधान केलं. तसंच यावेळी मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीत विक्रमी जागा जिंकण्याचा दावा करत एक-दोन दिवसात भाजपाची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती दिली. मुंबईतील प्रदेश कार्यालयात ते पत्रकारांशी संवाद साधत होते. 


दिग्गज भाजपाच्या वाटेवर

महाराष्ट्रातील एकूण लोकसभेच्या जागांपैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. तसंच विरोधी पक्षांचे दिग्गज नेते भाजापाच्या वाटेवर असून त्यासाठी थोडी वाट पाहण्याचं आवाहनही त्यांनी केलं.


पवार संभ्रमात

हवाई दलाने पाकिस्तावर केलेल्या हल्ल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काय वक्तव्य केलं हे आपल्याला ठाऊक नाही. पण त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं ते एकूण संभ्रमात असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. लष्कराच्या एअर स्टाईकचं श्रेय पंतप्रधानांना जाईल याची त्यांना भीती वाटत आहे, असंही ते म्हणाले.


रिपाइंला जागा नाही

रामदास आठवले यांच्या रिपाइंला लोकसभेसाठी जागा देण्यात येणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. असं असलं तरी विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांचं समाधान करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील हे बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.हेही वाचा -

अर्जुनाचा ‘बाण’ भात्यात

राजीनामा दिलाच नाही; विखे-पाटील यांचं स्पष्टीकरण
संबंधित विषय
ताज्या बातम्या