राजीनामा दिलाच नाही; विखे-पाटील यांचं स्पष्टीकरण

मंगळवारी विखे-पाटील यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त सर्वत्र पसरलं होतं. त्यावर स्पष्टीकरण देताना विखे-पाटील यांनी आपण राजीनामा दिलाचं नसल्याचं म्हटलं आहे.

SHARE

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या ‘ना’राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. ते पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सोपवणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. त्यातच मंगळवारी त्यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त सर्वत्र पसरलं होतं. त्यावर स्पष्टीकरण देताना विखे-पाटील यांनी आपण राजीनामा दिलाच नसल्याचं म्हटलं आहे.


अफवांना पूर्णविराम

राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील हेदेखील आपल्या विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देतील अशा चर्चा रंगत होत्या. परंतु त्यांनी आपण राजीनामा दिला नसल्याचं सांगत अफवांना पूर्णविराम दिला.

यापूर्वी त्यांनी आपण सुजय यांचा प्रचार करणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. तसंच काँग्रेसच्या पक्षनेतृत्वाशी आपली बांधिलकी असून आपल्याबाबत पक्ष आणि पक्षनेतृत्व जो काही निर्णय घेईल तो मान्य असेल, असंही विखे-पाटील म्हणाले होते.हेही वाचा -

जिओसाठी एमटीएनएल गाळात; खा. अरविंद सावंत यांचा आरोप

भारतात आयफोन ६ ची विक्री बंदसंबंधित विषय
ताज्या बातम्या