भारतात आयफोन ६ ची विक्री बंद

अॅपल कंपनीने भारतात आयफोन ६, आयफोन ६ एस आणि आयफोन ६ प्लसची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही, तर ज्या स्टोअर्समध्ये महिन्याला ३५ हून अधिक आयफोन विकले जात नाहीत, असे स्टोअर्सही कंपनी बंद करणार आहे.

SHARE

आयफोनला मिळत असलेल्या कमी प्रतिसादामुळे अॅपल कंपनीने भारतात आयफोन ६, आयफोन ६ एस आणि आयफोन ६ प्लसची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही, तर ज्या स्टोअर्समध्ये महिन्याला ३५ हून अधिक आयफोन विकले जात नाहीत, असे स्टोअर्सही कंपनी बंद करणार आहे.


कारण काय?

भारतात अॅपलची प्रीमियम ब्रँड व्हॅल्यू कायम राखण्याचा कंपनीचा मनोदय आहे. आयफोन ६ ची विक्री बंद करून कंपनीला केवळ प्रीमियम फोनवरच लक्ष केंद्रीत करायचं आहे. यामुळे आयफोनच्या किंमतीत ५ हजार रुपयांची वाढ अपेक्षित आहे.


कधी आला मार्केटमध्ये?

अॅपलने २०१४ मध्ये आयफोन ६ लाॅन्च केला होता. या फोनच्या ३२ जीबी माॅडेलची किंमत अंदाजे २४,९०० रुपये आणि आयफोन ६ एसची किंमती २९,९०० रुपये एवढी आहे. अॅपलने 'डिस्काऊंटेड ब्रँड' ह टॅग हटवण्यासाठी गेल्यावर्षी आयफोन एसई ची सुरूवातीची किंमत २१ हजार रुपयांनी वाढवली होती. सोबतच हे माॅडेल आॅफलाईन स्टोअरवरून देखील हटवलं होतं.


प्रीमियम ब्रँड

बघता बघता आयफोन ६ च्या विक्रीला मिळणारा प्रतिसाद कमी होत गेला. आयफोन ६ एस ची मॅन्यूफॅक्चरिंग भारतात होत असली, तरी त्याची किंमती कमी होण्याची जराही शक्यता नाही. भारतात अॅपलची ओळख एक प्रीमियम ब्रँड म्हणूनच राहावी, अशी कंपनीची इच्छा आहे. त्यासाठीच कंपनी आयफोनच्या किंमती वाढवण्याचा विचार करत आहे.

सोबतच ज्या स्टोअर्सचं क्षेत्रफळ ३५० चौ.फू. ते ४०० चौ.फू. पेक्षा कमी आहे, तसंच ज्या दुकानामध्ये महिन्याला ३५ हून कमी आयफोनची विक्री केली जाते, असे स्टोअर्स देखील कंपनी बंद करणार आहे.हेही वाचा-

चालाल तर कमवाल, एक किलोमीटर चाला आणि १० रुपये कमवा

एव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉरचे चाहते आहात? मग मार्व्हल्सच्या या कॅफेला भेट द्यासंबंधित विषय
ताज्या बातम्या