Advertisement

विसर्जन मिरवणुकीसाठी महापालिका सज्ज, 9 हजार कर्मचारी तैनात!


विसर्जन मिरवणुकीसाठी महापालिका सज्ज, 9 हजार कर्मचारी तैनात!
SHARES

गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी जशी भक्त मंडळी तयार झाली आहेत, तशीच मुंबई महानगरपालिकाही सज्ज झाली आहे. विसर्जनासाठी गिरगांव चौपाटीसह मुंबईतील ६९ विसर्जन स्थळांवर तसेच ३२ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यासाठी चौपाटींसह सर्व विसर्जन स्थळांवर ९ हजार कर्मचारी तसेच अधिकारी तैनात करण्यात आले  आहेत.


चौपाट्यांवर स्टील प्लेट्स

चौपाटीवरील भुसभुशीत रेतीमध्ये विसर्जनासाठी येणारी वाहने अडकू नयेत व मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडावे, याकरीता चौपाटीच्या किनाऱ्यावर ८४० जाड लोखंडी फळ्या (स्टील प्लेट्स) ठेवण्यात येतात. परंतु, यावर्षी विविध गणेश मंडळांच्या विनंतीनुसार अतिरिक्त लोखंडी फळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश विसर्जन सुरळीत पार पडण्यासाठी टोईंग वाहने, क्रेन्स, जे. सी. बी. मशिन्स, बुलडोझर इत्यादी यंत्रसामुग्री देखील विसर्जनाच्या वेळेपर्यंत तैनात करण्यात आली आहे.


'विसर्जनदिनाचे पावित्र्य जपावे'

विसर्जनदिनाचे पावित्र्य व मांगल्य जपावे. उत्सवादरम्यान गर्दीच्या ठिकाणी, तसेच विसर्जन प्रसंगी पालकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी, श्री गणेश मूर्तींचे विसर्जन समुद्रात करताना समुद्रास येणारी भरती आणि ओहोटी लक्षात घेऊन समुद्रात जावे, जेणेकरुन अप्रिय घटना टाळता येतील, असे आवाहनही मुंबईचे महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर आणि महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संयुक्तपणे केले आहे.


विसर्जन स्थळांवर जय्यत तयारी

  • ५० जर्मन तराफ्यांची व्यवस्था
  • ६०७ जीवरक्षकांसह जर्मन तराफे, ८१ बोटींची व्यवस्था
  • २०१ निर्माल्य कलश
  • १९२ डंपर, कॉम्पॅक्टर
  • १ नियंत्रण कक्ष
  • ५८ निरीक्षण कक्ष
  • ४८ निरीक्षण मनोरे
  • ८७ स्वागत कक्ष
  • ७४ प्रथमोपचार केंद्रांची व्यवस्था
  • १९९१ दिवे (फ्लड लॅन्टर्न)
  • १३०६ शोधदीप (सर्च लाईट)
  • ११८ फिरती शौचालये
  • ६० डॉक्टरांसह सुसज्ज रुग्णवाहिका


विसर्जन करताना घ्यावयाची काळजी

  • खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करु नका
  • समुद्रकिनाऱ्यांवर देण्यात आलेली भरती व ओहोटीच्या वेळांची माहिती समजून घ्या
  • गणेशमूर्ती विसर्जनाकरीता शक्यतो महापालिकेमार्फत नेमण्यात आलेल्या प्रशिक्षित मनुष्य‍बळाची मदत घ्या
  • अंधार असणाऱ्या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाकरीता जाण्याचा प्रयत्न करु नका
  • मोठ्या गणेशमूर्तींबरोबर प्रत्यक्ष विसर्जनाकरीता समुद्रात जाणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिरगणती करुन जावे
  • महापालिकेने पोहोण्याकरीता निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करु नका
  • कुणी बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरीत त्याची माहिती अग्निशमन दलाचे जवान, पोलिस, जीवरक्षकांना द्या
  • नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे श्वसनाचा त्रास जाणवत असल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्या
  • अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका


खबरदारीच्या सूचना...

  • भाविकांनी आपल्या लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना पाण्यात/विसर्जनस्थळी जाण्यापासून मज्जाव करावा
  • मूर्तींचे विसर्जन करतेवेळी पाण्याात गमबुट घालावेत
  • विसर्जनासाठी महापालिकेने दिलेल्या विनामूल्य तराफ्यांचा किंवा बोटींचा वापर करावा
  • मद्यप्राश्‍ान करुन समुद्रकिनाऱ्यावर विसर्जनस्थाळी जाऊ नये, अशा व्याक्तींवर मत्स्यदंश झाल्यास वैद्यकीय उपचारांची परिणामकारकता घटते


भाविकास मत्स्यदंश झाल्यास...

  • समुद्रातून बाहेर आल्यावर आपणांस मत्स्यदंश जाणवल्यास तात्काळ ती जागा स्वच्छ पाण्याने धुवावी, अथवा उपलब्ध असल्यास त्यावर बर्फ लावावा
  • माशांचा दंश्‍ा झालेल्या ठिकाणाहून रक्तस्त्राव होत असेल, तर जखमेचे ठिकाण स्व‍च्छ कपड्याने किंवा हाताने दाबून धरावे, जेणेकरुन जास्त प्रमाणात रक्तास्राव होणार नाही
  • मत्स्यदंश झालेल्या भाविकांनी घाबरुन न जाता समुद्रकिनाऱ्यावरील महानगरपालिकेच्या प्रथमोपचार केंद्रात जाऊन विनामूल्य वैद्यकीय सेवा प्राप्त करुन घ्यावी


भरती आणि ओहोटी

तारीख
वेळ
भरती/ओहोटी
०५.०९.२०१७
सकाळी ११.३६ वा.
भरती - ०४.११ मी.
०५.०९.२०१७
सायंकाळी ०५.३७ वा.
ओहोटी - ०१.४० मी.
०५.०९.२०१७
 रात्री २३.४५ वा.
भरती - ०३.८६ मी.
०६.०९.२०१७
पहाटे ०५.२६ वा.
ओहोटी - ००.८१ मी.




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा