Advertisement

झाडाची फांदी अंगावर पडून ९१ वर्षीय महिलेचा मृत्यू


झाडाची फांदी अंगावर पडून ९१ वर्षीय महिलेचा मृत्यू
SHARES

अजून पावसाळा सुरू झालेला नसताना मुंबईत झाड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. मागच्या महिन्यात झाड अंगावर कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. आता वाळकेश्वर परिसरात झाडाची फांदी पडून एका ९१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. सुखी लिलाजी असं या मृत महिलेचं नाव आहे.


अपघाती मृत्यूची नोंद

वाळकेश्वरच्या बाणगंगा तलावाजवळ सुखी लालजी या सकाळी ६ च्या सुमारास त्यांच्या कुटुंबियोसोबत मॉर्निगवॉकसाठी निघाल्या होत्या. त्यावेळी एका झाडाची मोठी फांदी त्यांच्या अंगावर पडली. यामध्ये सुखी यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्या जागीच कोसळल्या. त्यावेळी स्थानिकांनी त्यांना जवळील रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं.

या प्रकरणी मलबार हिल पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यता आली आहे. मागील दोन वर्षांत झाड पडून मृत्यूच्या पाच घटना घडल्या आहेत.


हेही वाचा - 

झाड अंगावर कोसळून एकाचा मृत्यू

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा