Advertisement

वांद्र्यात स्लॅब कोसळल्याने १२ वर्षाचा मुलगा जखमी


वांद्र्यात स्लॅब कोसळल्याने १२ वर्षाचा मुलगा जखमी
SHARES

वांद्र्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या शासकीय वसाहतीतील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील घराचा स्लॅब कोसळल्याची घटना गुरुवारी पहाटे ३.३० च्या सुमारास घडली.


१२ वर्षाचा मुलगा जखमी

या घटनेत प्रमिला मिसाळ यांचा १२ वर्षांचा मुलगा इशान जखमी झाला आहे. यामध्ये मुलाच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याच्या डोक्याला ४ तर, हाताला ६ टाके पडले आहेत. इशान हा सातवीत शिकत असून त्याचा उद्या शेवटचा पेपर आहे.


रहिवासी भीतीच्या सावटाखाली

यासर्व घटनेमुळे तो प्रचंड घाबरला आहे. या कॉलनीत स्लॅब कोसळण्याचे प्रकार हे नेहमी होत असतात. त्यामुळे इथले रहिवासी प्रचंड घाबरले आहेत. ४ ते ५ महिन्यांपूर्वी येथील इमारत क्रमांक ७ मध्ये स्लॅब कोसळून८ वर्षीय रोशनी जखमी झाली होती. तिच्याही डोक्याला टाके पडले होते. या शासकीय इमारतींची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून सरकार या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप इथल्या रहिवाशांनी केला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा