माहिमचा 'दंबग खान' करतोय जगण्यासाठी संघर्ष

माहिमचा 'दंबग खान' करतोय जगण्यासाठी संघर्ष
माहिमचा 'दंबग खान' करतोय जगण्यासाठी संघर्ष
माहिमचा 'दंबग खान' करतोय जगण्यासाठी संघर्ष
See all
मुंबई  -  

बॉलिवूडमधल्या सलमान खानची दबंगगिरी आपण सगळ्यांनीच बघितली असेल. पण मुंबईतल्या खऱ्याखुऱ्या दबंग खानची डेरिंग मात्र अजूनही उपेक्षितच आहे. माहिममध्ये राहणारा हसन रशीद खान गेल्या 16 वर्षांपासून बीचवर बुडणाऱ्या लोकांची मदत करत आला आहे. 


रिअल लाईफमधील माहिमचा हिरो

'समुद्रात अधिक आत जाऊ नये' असे फलक समुद्र किनारी लावलेले असतानाही अनेकांना समुद्रात पोहण्याचा मोह आवरता येत नाही. अशावेळी पाण्याची पातळी वाढली की बुडण्याचा धोका असतो. खासकरुन माहिमच्या चौपाटीवर अशा बुडणाऱ्यांचे प्राण या हसन खानने वाचवले आहेत. 36 वर्षांचा हसन खानचा दोन मुले आणि पत्नी असा परिवार आहे. गेल्या 20 वर्षांपासून तो बिनपगारी जनसेवेसाठी काम करतो. 2010 साली तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी त्याचे कौतुकही केले होते. तसेच जीवनरक्षा पदक देऊन या युवकाचा सन्मानही करण्यात आला होता. पण हसन आज हलाखीचे जीवन जगत आहे. जो लोकांचे घर वाचवतो, मात्र आज त्याचेच घर समुद्राच्या किनारी असून ते कधीही वाहून जाऊ शकते अशी अवस्था आहे.

एकही जीवरक्षक तैनात नसलेल्या माहिमच्या समुद्रकिनारी हसन खान याने कित्येक बुडणाऱ्यांचे प्राण वाचवले आहे. त्याने आपली लाईफ गार्डपदी नेमणूक व्हावी यासाठी सरकार दरबारी अनेकदा प्रयत्न केले. पण त्याचे हे स्वप्न लाल फितीच्या फाईलमध्ये गुंडाळून पडले असल्याचे हसनने 'मुंबई लाइव्ह'ला सांगितले.


इयत्ता आठवी वर्गात असताना मला कमी मार्क पडले होते. त्यामुळे मानसिक स्थिती अत्यंत खालावली होती. काय करावे सुचत नव्हते. तेव्हा समुद्र किनारी फिरत होतो. त्यावेळी मला कसलंच भान राहिलं नव्हतं. त्यामुळे पाण्याची पातळी खोल असल्याने मी बुडायला लागलो. पण एका देवदूताने माझे प्राण वाचवले. ही घटना 10 मे 2011 रोजी घडली होती. सध्या मी बिहारमध्ये माझ्या गावात शेती करत असलो, तरी आजपर्यंत त्या देवदूताला विसरु शकलेलो नाही.


- बिपीन सिंग, रहिवासी, कळवा

बुडत्यांना आधार देणारा हा युवक समुद्राच्या किनारपट्टीवर लहानसहान मासे पकडून कसाबसा आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत आहे. पण परिस्थिती काही बदलत नाही. जो लोकांचे जीव वाचवतो, फिल्मी दुनियेत त्यालाच हिरो म्हणतात.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.