Advertisement

मुंबईत पार्ट्यांवर बंदी, इमारतीही सील, काय म्हणाले आदित्य ठाकरे?

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्टीचा विचार करत आहात मग आधी हे वाचाच... कोरोना पुन्हा हातपाय पसरतोय म्हणूनच कडक निर्बंध केले जात असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

मुंबईत पार्ट्यांवर बंदी, इमारतीही सील, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
SHARES

मुंबईत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सेलिब्रेशन पार्टीवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी नवीन वर्षानिमित्त होणारे कार्यक्रम, पार्टी रद्द करण्यात येणार असल्याचं मुंबईचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्यापार्श्वभूमीवर पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका मुख्यालयात आढावा घेतला.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले की, कोरोनाबाधितांची संख्या वाढली असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे. मात्र, तरीदेखील काळजी घेणे आवश्यक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. कोरोना निर्बंधांचे सर्वांना पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

आदित्य ठाकरेंनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे

  • एखाद्या इमारतीत १० पेक्षा जास्त व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास ती संपूर्ण इमारत पुढील पंधरा दिवस सील केली जाईल.
  • इमारतींच्या टेरेसवरील पार्टीबाबतही लोकांनी फेरविचार करावा असं आवाहनही त्यांनी केलं.
  • सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या पार्ट्या होणार नाहीत.
    ३१ डिसेंबर किंवा न्यू ईयरच्या पार्श्वभूमीवर कोणीही पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊन कार्यक्रम करू नयेत.
  • मुंबईत ५८ हजार बेड्स उपलब्ध आहेत. मात्र नागरिकांनी गरज असल्याशिवाय बाहेर पडणं टाळावं
  • शाळा, कॉलेजसंदर्भात निर्णय घेण्यासाठी पालक किंवा डॉक्टरांनी अद्याप कोणतीही मागणी केलेली नाही. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय आणखी दोन दिवसांनी घेतला जाईल.
  • निर्बंधांचे उल्लंघन करून हॉटेल, रेस्टोरंट्स सुरू झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार.



हेही वाचा

कोविड-१९ रुग्णांसाठी राखीव असलेल्या ९०% खाटा रिक्त

२ दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन निर्बंधांबाबत निर्णय घेणार- राजेश टोपे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा