यांच्या अडचणी कधी सुटणार?

गोरेगाव - आरे कॉलनीमध्ये तब्बल 27 आदिवासी पाडे आहेत. या पाड्यांतून आद्य रहिवासी असलेले आदिवासी आजही वास्तव्य करून आहेत. मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.

याबाबत रहिवाशांनी नगरसेवकांकडे वारंवार तक्रारी केल्यात. मात्र ना येथील नागरिकांच्या समस्यांची दखल महापालिकेनं घेतली ना नगरसेवकांनी. पण, लोकप्रतिनिधींना ते मान्य नाही.

महापालिकेने आरेतील आदीवासी पाड्यांतल्या समस्यांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवलेही. पण ते पुरेसं आहे का? त्यातून येथील रहिवाशांच्या समस्या सुटतील का, हाच खरा प्रश्न आहे.

Loading Comments