Advertisement

विकास आराखड्यानुसार मुंबईचे नकाशे संकेतस्थळावर


विकास आराखड्यानुसार मुंबईचे नकाशे संकेतस्थळावर
SHARES

मुंबई महानगर पालिकेकडून तयार करण्यात आलेला विकास आराखडा -२०३४ ला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार राज्य सरकारकडून पालिकेला प्राप्त झालेले मुंबई शहराचे नकाशे जनतेच्या माहितीसाठी पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

Portal.mcgm.gov.in आणि www.mcgm.gov.in पालिकेच्या या संकेतस्थळासह पालिका मुख्यालयातील सभागृह क्रमांक ३ मध्ये उपलब्ध होतील अशी माहिती पालिकेकडून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.


नागरिकांकडून सूचना मागवल्या

 या नकाशाच्या अनुषंगाने नागरिकांना ५ आॅगस्टपर्यंत आपल्या सुचना-हरकती नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नगररचना खात्याच्या उपसंचालकांकडे सुचना-हरकती नोंदवायच्या असल्याची माहिती पालिकेच्या विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली आहे. ८ मे रोजी विकास आराखडा -२०३४ ला राज्य सरकारच्या अधिसुचनेद्वारे काही बदल वगळून मंजुरी देण्यात आली. नागरिकांना ५ आॅगस्टपर्यंत उपसंचालक, नगररचना, बृहन्मुंबई, ई-ब्लाॅक, इएनएसए हटमेंट, आझाद मैदान, महापालिका मार्ग, मुंबई-१ येथे सुचना-हरकती नोंदवता येतील.



हेही वाचा -

विद्यापीठाच्या निकालांवर कुलगुरूंची करडी नजर

एसटीची 'शयनयान' लवकरच प्रवाशांच्या सेवेत



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा