Advertisement

विनामास्क फिरणाऱ्या ३० लाख ४४ हजार मुंबईकरांवर कारवाई

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी मास्क घालणं बंधनकारक आहे. मात्र, मुंबईत अनेक जण मास्क न घालताच फिरत असल्याचं दिसून येत आहे.

विनामास्क फिरणाऱ्या ३० लाख ४४ हजार मुंबईकरांवर कारवाई
SHARES

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी मास्क घालणं बंधनकारक आहे. मात्र, मुंबईत अनेक जण मास्क न घालताच फिरत असल्याचं दिसून येत आहे. अशा नागरिकांवर मुंबई पालिका, रेल्वे आणि पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. 

मुंबईत आतापर्यंत विनामास्क फिरणाऱ्या ३० लाख ४४ हजार ७९४ नागरिकांवर  पालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईतून ६१ कोटी २८ लाख ६२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यात पोलिसांनी आठ कोटी २५ लाख तीन हजार रुपये तर रेल्वेच्या विनामास्क प्रवाशांकडून फक्त ५० लाख ३९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती आहे. त्यामुळे पालिकेने २४ विभाग कार्यालयाच्या हद्दीत भरारी पथके तैनात केली आहेत. पोलिसांनाही कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तसेच रेल्वे हद्दीतील प्रवाशांवर कारवाईसाठी रेल्वे प्रशासनावर जबाबदारी देण्यात आली आहे.

गेल्या दीड वर्षात तीस लाखांहून अधिक नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विनामास्क फिरणा-यांवर २०० रुपये दंड आकारण्यात येत आहे. ही मोहीम आता आणखी तीव्र केली जाणार आहे. विनामास्क फिरणा-यांकडून १२०० रुपये दंड आकारण्याचा विचार पालिकेकडून केला जातो आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा