Advertisement

२१ दिवसांत मास्क न वापरणाऱ्या ८२ हजार जणांवर कारवाई

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क लावणं बंधनकारक आहे. मात्र, अनेक जण मास्क न घालता फिरत असल्याचं दिसून आलं आहे. अशा नागरिकांविरोधात मुंबई महापालिकेने कारवाई आणखी तीव्र केलं आहे.

२१ दिवसांत मास्क न वापरणाऱ्या ८२ हजार जणांवर कारवाई
SHARES

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क लावणं बंधनकारक आहे. मात्र, अनेक जण मास्क न घालता फिरत असल्याचं दिसून आलं आहे. अशा नागरिकांविरोधात मुंबई महापालिकेने कारवाई आणखी तीव्र केलं आहे. महापालिकेने १ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत ८२ हजार ४९७ नागरिकांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी २०० रुपये असा एकूण एकूण १ कोटी ६४ लाख रुपयांचा दंडल वसूल केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना मास्क लावणे बंधनकारक आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर २०० रुपयांचा दंड आकारला जात आहे. लाॅकडाऊननंतर मुंबईत गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून सुरक्षित अंतर राखण्यासह मास्कच्या वापरासाठी जनजागृती केली जात आहे. मात्र, मुंबईत मास्क न घालणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने कारवाई आणखी तीव्र केली आहे.

पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याकडून मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.  ९ एप्रिल ते २१ ऑक्टोबर या कालावधीत १ लाख ७५२ नागरिकांकडून २ कोटी ३० लाख २९ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. १ ते २१ ऑक्टोबर या २१ दिवसांत एकूण ८२ हजार ४९७ नागरिकांवर कारवाई करण्यात आली.  एकूण १ कोटी ६४ लाख ९६ हजार ९०० रुपये  दंड वसूल करण्यात आला.  दंडापोटी मागील २१ दिवसांत वसूल केलेली रक्कम ही आतापर्यंतच्या एकूण रकमेच्या सुमारे ७२ टक्के इतकी आहे.



हेही वाचा -

सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल: एक ते दोन दिवसांत निर्णय? 

वकिलांना ‘या’ अटीवर लोकल प्रवासाची मुभा



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा