बोरीवली दंडाधिकारी न्यायालयातल्या शौचालयाची दुरवस्था

 Borivali
बोरीवली दंडाधिकारी न्यायालयातल्या शौचालयाची दुरवस्था

बोरीवलीतील दंडाधिकारी न्यालयातल्या शौचालयाची दुरवस्था झाली आहे. या शौचालयातील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने न्यायालयात कामानिमित्त येणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. बोरीवली अॅडव्होकेट बार असोसिएशनने याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करत तात्काळ शौचालय दुरुस्तीची मागणी केली आहे.

बोरीवली (प.) इथल्या दंडाधिकारी न्यायालयात रोज अनेक नागरिक काही ना काही कामानिमित्ताने येत असतात. मात्र या कोर्ट क्रमांक 27 च्या समोर सार्वजनिक शौचालय आहे. त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे न्यायालय परिसरात दुर्गंधी पसरते. या संदर्भात बोरीवली अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला पत्र लिहून शौचालयाच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.

Loading Comments