Advertisement

इमानपाठोपाठ तीन लठ्ठ मुलं सैफीत दाखल, रोज १०० पोळ्या करतात फस्त!


इमानपाठोपाठ तीन लठ्ठ मुलं सैफीत दाखल, रोज १०० पोळ्या करतात फस्त!
SHARES

जगातील सर्वात लठ्ठ महिला अशी ओळख असलेल्या इमान अहमदचे वजन कमी केल्यानंतर मुंबईतील सैफी रुग्णालयापुढं नवं आव्हान आहे, ते गुजरातमधील तीन लठ्ठ मुलांचं वजन कमी करण्याचं. ही तिन्ही मुलं सैफी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली आहेत. त्यामुळे अवास्तव वाढलेलं वजन कमी करण्यासाठी सैफी रुग्णालयाकडे लठ्ठ पेशंट आशेनं पाहू लागल्याचं चित्र दिसून येत आहे.

गुजरातच्या उना जिल्ह्यातील वजदी गावात राहणारी ही मुलं आहे. यापैकी 7 वर्षांच्या योगिता नंदवाना हिचं वजन 45 किलो एवढं आहे. तर तिच्यापेक्षा लहान असलेली तिची पाच वर्षांची बहीण अहिशा हिचं वजन 68 किलो एवढं आहे. त्यांचा तीन वर्षांचा लहान भाऊ हर्ष याचं वजन 25 किलो एवढं आहे. या तिघांचं वजनही इमानप्रमाणेच जन्मत:च जनुकीय दोषांमुळे वाढलेलं आहे. या तिघांवरही डॉ. मुफ्फझल लकडावाला इमानप्रमाणे उपचार करणार आहेत.

100 चपात्या करतात फस्त -
या तिन्ही मुलांचे वडील शेतकरी असून त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे डॉ. लकडावाला यांनी या तिघांवर उपचारासाठी मदतीचा हात पुढं केला आहे. या तिन्ही मुलांचा आहार एखाद्या पहेलवानाला लाजवेल इतका आहे. ही तिन्ही मुलं मिळून दररोज जवळपास 100 चपात्या फस्त करतात. दिवसेंदिवस त्यांच्या वजनात वाढच होत असल्याने या तिन्ही मुलांचं वजन कमी करण्याचं नवं आव्हान डॉ. लकडावाला यांच्यासमोर असणार आहे. लकडावाला यांनी याअगोदर 500 किलो वजनाच्या इमानचे वजन यशस्वीरित्या घटवले होते.

इमान अहमद इजिप्तहून मुंबईला आली होती, तेव्हा तिचं वजन 500 किलो होतं. ती अबुधाबीला रवाना होताना तिचं वजन 176 किलो एवढं होतं. सैफी रुग्णालयात इमानवर तीन महिने उपचार सुरू होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा