नगरसेवकांचेही आता मोबाईल अॅप


SHARE

 खासदार, आमदारांपाठोपाठ आता नगरसेवकांनीही आपले मोबाईल अॅप बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वडाळामधील प्रभाग क्रमांक १७९चे शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी आपल्या विभागातील नागरिकांना समस्या थेट मांडता याव्यात यासाठी डिजिटल माध्यम उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे नागरिकांना आता केवळ अॅपवर भेट देवून आपल्या समस्या आपल्या नगरसेवकापर्यंत मांडता येणार आहे.

खासदार,आमदारांपाठोपाठ...

युवा सेनेचे पदाधिकारी असलेले अमेय घोले हे वडाळामधील प्रभाग क्रमांक १७९ निवडून आल्यानंतर अवघ्या सातव्याच महिन्यात त्यांनी जनतेसोबतची संपर्काची नाडी अधिक भक्कम करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या विभागातील नागरिकांना तक्रारी तसेच समस्या मांडता याव्यात, तसेच त्यांच्या या समस्या सोडवता याव्यात म्हणून मोबाईल अॅपची सेवा उपलब्ध करून दिली आहे. शेवाळेंसोबतच सध्या अनेक खासदार आणि आमदारांनीही आपल्या मतदार संघासाठी मोबाईल अॅप बनवलेली आहेत.

समस्या निवारणाची  मिळणार एसएमएसद्वारे पोचपावती

मात्र, खासदार आणि आमदारांप्रमाणेच आता शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनीही आपल्या प्रभागासाठी स्वतंत्र मोबाईल अॅप बनवला आहे. हा मोबाईल अॅप आपल्या एन्ड्राईड मोबाईल तसेच अॅपल मोबाईलवर अपलोड करून त्याद्वारे नागरिकांना थेट आपल्या नगरसेवकाशी संवाद साधता येणार आहे. मोबाईल अॅपवर नोंदवलेल्या तक्रारी तसेच समस्यांची दखल घेतल्यानंतर नगरसेवकांकडून त्यांना 'एसएमएस' पाठवला जाईल आणि पुढील प्रत्येक टप्प्यातील कार्यवाहीची माहिती नगरसेवकाकडून नागरिकांना 'एसएमएस'द्वारे दिली जाणार आहे. विशेष म्हणजे आजवर खासदार आणि आमदारांनी बनवलेल्या मोबाईल ऍप हे केवळ ऍन्ड्राईडवर मोबाईलवर आधारीत असून हे मोबाईल ऍप हे अॅपलवर मोबाईल आधारीत असल्याचे  अमेय घोल यांनी सांगितले.

एकमेव नगरसेवक

अमेय घाले यांच्या या मोबाईल ऍपचे उद्घाटन शुक्रवारी दिवाळी पाडवा निमित्त शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब, रश्मी ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे या सर्वांच्या हस्ते करण्यात आले आहेत. अशाप्रकारे मोबाईल ऍपची सुविधा देणारे मुंबई महापालिकेतील हे एकमेव नगरसेवक ठरणार आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांमध्येही त्यांनी आघाडी घेतली असून कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न आपण सोडवतच असतो. परंतु जे शाखेत येत नाहीत,अशांच्या समस्यांचे निवारण करता यावे म्हणून या मोबाईल ऍपची निर्मिती केलेली आहे. मोबाईल मधील Google Play Store (Anroid) व Apple App Store मध्येही उपलब्ध असून प्रभागातील नागरिकांनी हे अॅप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून घेत  याद्वारे आपल्या समस्या तसेच तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचावाव्यात असे आवाहन घोले यांनी केले आहे.


  • अशाप्रकारे मिळणार मोबाईल ऍपद्वारे सुविधा
  • आता आपल्या समस्या ‘App’ द्वारे नगरसेवका कळवा
  • - नागरी तक्रारी
  • - ई - सेवा
  • (आधार कार्ड, पॅन कार्ड, जेष्ठ नागरिक कार्ड, ड्रायविंग लायसन्स)
  • - उत्पन्न दाखला
  • - धूर फवारणीसंबंधित विषय
ताज्या बातम्या