Advertisement

निवडणुकिंच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचा अजेंडा नागरिकांचे आरोग्य

पालिका निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षातील मंत्री नागरिकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्र करीत आहेत.

निवडणुकिंच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचा अजेंडा नागरिकांचे आरोग्य
SHARES

येत्या काही महिन्यांत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुका जवळ येत आहेत. पालिका निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षातील मंत्री नागरिकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्र करीत आहेत.

विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार देखील आरोग्य शिबिरे आयोजित करत आहेत. यामध्ये ते पॅथॉलॉजी चाचण्या, मोफत औषधे आणि निदान तसंच अगदी मोफत नेत्र तपासणी आणि चष्मा देत आहेत, असं अहवालात नमूद केलं आहे.

संपूर्ण मुंबईत, जवळपास डझनभर आरोग्य शिबिरे यापूर्वीच आयोजित केली गेली आहेत आणि आणखी अनेक शिबिरे होणार आहेत.

साथीच्या आजारामुळे आरोग्याबाबत जागरुकता वाढली आहे. त्यामुळे रहिवासी मोठ्या संख्येनं आरोग्य शिबिरांना येत असल्याचं नगरसेवकांचं म्हणणं आहे. अनेक नगरसेवकांनी चाचणी आणि उपचारांसाठी खाजगी रुग्णालये आणि पॅथॉलॉजी लॅबशी करार केला आहे. तर त्यापैकी काही पालिका संचालित रुग्णालयांची मदत घेत आहेत.

दरम्यान, फेब्रुवारीमध्ये होणार्‍या पालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. कारण प्रशासकिय संस्था वायव्य ते आग्नेय मुंबईपर्यंतच्या प्रभागांची पुनर्रचना करण्याची नवीन योजना हाती घेण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्र मंत्रिमंडळानं २२७ वरून २३६ नगरसेवक वाढवण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर हे करण्यात आले आहे. सर्व नऊ नगरसेवक मुंबई उपनगरात जोडले जाण्याची शक्यता आहे. कोविड-19 साथीच्या आजारामुळे २० महिन्यांच्या अंतरानंतर पालिकेनं नुकतीच पहिली ऑफलाईन बैठक घेतली.



हेही वाचा

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांची मदत

महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा