Advertisement

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांची मदत

पण बाळासाहेब थोरात यांनी मागणी केली आहे की, सरकारनं भरपाईची रक्कम ४ लाखांपर्यंत वाढवावी.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांची मदत
SHARES

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील जीआर राज्य सरकारनं काढला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. ही मदत नातेवाईकांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यानुसार ही मदत मिळवण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत आहे. आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लाथार्थ्याच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.

मदत मिळवण्यासाठी हे नियम

  • राज्यात जी व्यक्ती कोरोनामुळे निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास ५० हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून देण्यात येणार आहे.
  • कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू हा रुग्णालयात Clinical diagnosis च्या दिनांकापासून ३० दिवसाच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला असं समजण्यात येईल.
  • जरी हा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीनं कोरोनाचे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरीही ही मदत दिली जाणार आहे.
  • कोरोनाबाधित व्यक्तीचा रुग्णालयामध्ये दाखल असतांना मृत्यू रुग्णालयात झालेला असेल, जरी मृत्यू ३० दिवसाच्या नंतर झाला असेल तरी, अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल.
  • जी व्यक्ती कोरोनामुळे बरी झालेली नव्हती, अशा प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात किंवा घरामध्ये झालेला आहे. त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ च्या कलम १० खाली Medical Certificate of Cause of Death (MCCD) हे Form ४ व ४ A मध्ये नोंदणी प्राधिकाऱ्याला निर्गमित केले आहे, अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल.
  • Medical Certificate and of Cause of Death (MCCD) मध्ये “कोव्हिड-19 मुळे मृत्यू" याप्रमाणे नोंद नसली तरीही अटीची पूर्तता होत असल्यास, ५० हजार रुपये मदत देण्यात येईल.

दरम्यान, काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री, बाळासाहेब थोरात यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सरकारनं भरपाईची रक्कम ४ लाखांपर्यंत वाढवावी, असं म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.

अहवालानुसार, मृतांच्या नातेवाईकांना दिलेली भरपाईची रक्कम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) द्वारे व्यवस्थापित केली जाते. ज्याद्वारे ही रक्कम केंद्र आणि राज्य सरकारमध्ये ७५:२५ च्या प्रमाणात सामायिक केली जाते. 

आत्तापर्यंत, ५०,००० रुपये नुकसान भरपाई निधी म्हणून ठरवण्यात आले होते. परंतु मंत्री थोरात यांनी ही रक्कम अपुरी आहे आणि ती वाढवावी अशी मागणी केली आहे.



हेही वाचा

महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश

मुंबईतील ७०% लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा