Advertisement

पंतप्रधान मोदी आज मुंबईत, वाहतुकीच्या मार्गात बदल, कोणते मार्ग बंद?

पंतप्रधान मोदी आज सीएसएमटी (CSMT) स्थानकावरुन वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवतील.

पंतप्रधान मोदी आज मुंबईत, वाहतुकीच्या मार्गात बदल, कोणते मार्ग बंद?
SHARES

मुंबई महापालिकेवर (BMC Election) आपली सत्ता प्रस्तापित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप आणि शिंदे गटाने आगामी निवडणुकीसाठई रणशिंग फुंकलंय. त्यासाठी आता थेट पंतप्रधान नरेंद मोदी (PM Narendra Modi) यांना मैदानात उतरवल्याचं पहायला मिळतंय. (MumBai traffic) 

भाजपने 'मिशन मुंबई'चा प्लॅन आखला असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही निवडणूक मनावर घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी यांचे मुंबई दौरे (Narendra Modi Mumbai Visit) वाढले आहेत. अशातच आज पंतप्रधान मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी काही मार्गात बदल केलेत. (Traffic update) 

पंतप्रधान मोदी आज सीएसएमटी (CSMT) स्थानकावरुन वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवतील. त्यामुळे वाहतूक कोंडी (Traffic congestion) टाळण्यासाठी दुपारी 2.45 ते 4.15 पर्यंत वाहतूक मार्गात काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CST) आणि मरोळमध्ये (Marol) मोदींचे कार्यक्रम असतील.

वाहतुकीच्या मार्गात महत्त्वाचे बदल -

ईस्टर्न फ्री वे (Eastern Free Way) मार्गावरची वाहतूक बंद करून, डी एन रोड आणि जे जे ब्रिजवर वळवण्यात आली आहे. त्यामुळे सीएसटीला जाण्यासाठी  जाण्यासाठी वाहनांनी ईस्टर्न फ्री वे मार्गाचा वापर केला जाणार नाही. 

कुलाब्यातल्या (Colaba) बधवर पार्क,नेव्ही नगर आणि कफ परेडची वाहतूक मंत्रालयाकडून वळवण्यात आलीये. 2.45 ते 4.15 पर्यंत हे बदल करण्यात आले आहेत.

अंधेरी (Andheri), घाटकोपर-कुर्ला रोडवरील मरोळ नाक्याच्या दिशेने येणारी वाहने साकीनाका जंक्शन येथून जे. व्हि. एल. आर. रोडने पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या दिशेने जातील.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा