Advertisement

तांत्रिक बिघाडानंतर एअर अॅाम्बुलन्सचं मुंबई विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग

नागपूर-हैदराबाद (Nagpur- Hyderabad) या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर हा हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

तांत्रिक बिघाडानंतर एअर अॅाम्बुलन्सचं मुंबई विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग
SHARES

मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) हाय अलर्ट घोषित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. नागपूर-हैदराबाद (Nagpur- Hyderabad) या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर हा हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या विमानाच्या एमर्जन्सी लँडिंगची तयारी करण्यासाठी अलर्ट जाहीर करण्यात आला होता.

नागपूर-हैदराबाद या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. तांत्रिक बिघाडानंतर विमान मुंबई विमानतळाच्या दिशेनं वळवण्यात आलं. तांत्रिक बिघाड झालेलं हे एक प्रायव्हेट जेट होतं. विमानाचं शेड्युल्ड नसल्यानं त्याला काही काळ विमानतळ परिसरात आकाशातच घिरट्या घालाव्या लागल्या. त्यानंतर विमानतळावर अलर्ट जाहीर करण्यात आला आणि मग विमानाचं मुंबई विमानतळावर लँडिंग करण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून हैदराबादला जाणाऱ्या एअर अ‍ॅम्बुलन्सचं लँडिंग गिअर खाली पडल्यानंतर विमानाला मुंबई विमानतळावर लँडिंगसाठी वळवण्यात आलं. या विमानानं नागपूरहून ज्यावेळी उड्डाण केलं होते त्यावेळी विमानाचं एक चाक खाली पडलं होतं. मात्र सुदैवानं या एअर अ‍ॅम्बुलन्सचं सुरक्षितपणे लँडिग करण्यात आलं आहे.

जेटसर्व एविएशन C-90 एअर अ‍ॅम्बुलन्स नागपूर ते मुंबई या मार्गावर उड्डाण करते. नागपूर विमानतळावरील रनवे ३२ वरून उड्डाण घेत असताना विमानाचं चाक विमानापासून वेगळं झालं.



हेही वाचा

कुत्रा विव्हळत होता, पण तो लोखंडी दांड्यानं मारत राहिला, अखेर...

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा