Advertisement

‘अत्त दिप भवं’, चैत्यभूमीवर अखंड भीमज्योतीचं अनावरण

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या अखंड भीमज्योतीचं बुधवारी दादरमधील चैत्यभूमी इथं करण्यात आलं.

‘अत्त दिप भवं’, चैत्यभूमीवर अखंड भीमज्योतीचं अनावरण
SHARES

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या अखंड भीमज्योतीचं बुधवारी दादरमधील चैत्यभूमी इथं करण्यात आलं. ‘अत्त दिप भवं’ म्हणजेच ‘स्वयंप्रकाशीत व्हा’ हा तथागत गौतम बुद्ध यांचा संदेश या भीमज्योतीच्या माध्यमातून आंबेडकरांच्या अनुयायांना मिळणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या भीमज्योतीचं अनावरण करण्यात आलं. ही भीमज्योत २४X७ तास प्रज्वलीत राहणार आहे.  

देशातील दुसरी भीमज्योत

चैत्यभूमी इथं अनावरण करण्यात आलेली भीमज्योत ही देशातील दुसरी अखंड प्रज्वलीत राहणारी भीमज्योत आहे. याआधी ३ महिन्यांपूर्वीच फोर्ट परिसरातल्या ओव्हल मैदानाजवळील डाॅ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर अशीच एक भीमज्योत बसवण्यात आली होती.  

महापालिकेचा निधी

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने मुख्यमंत्र्यांकडे भीमज्योत उभारण्याची मागणी केली होती. सामाजिक न्यायमंत्री आणि महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यात झालेल्या चर्चेनुसार महापालिकेच्या निधीतून ही भीमज्योत उभारण्याचं ठरलं.  

२४ तास तेवत राहणार

त्यानुसार महापालिकेने भीमज्योत उभारण्यासाठी वास्तूविशारदाची निवड केली. त्यांनी बनवलेल्या आराखड्यानुसार ही भीमज्योत उभारण्यात आली. त्यासाठी २१ लाख ५४ हजार रुपये, तर सुशोभीकरणासाठी ४२ लाख ७४ हजार रुपये इतका खर्च आला. चैत्यभूमीवरील भीमज्योत ८ फूट उंच ७ साडेसात फूट रुंद आहे. ८ मि.मी. जाडीच्या काचेच्या आत अखंड ज्योत बसवण्यात आली आहे. त्यासाठी आत बिडाच्या धातूचा वापर करण्यात आला आहे. या भीमज्योतीला महानगर गॅसच्या माध्यमातून २४ तास गॅस पुरवठा करण्यात येईल. हेही वाचा-

चैत्यभूमीवर अखंड भीमज्योत उभारण्यास राज्य सरकारची मान्यता

दीक्षाभूमी ते चैत्यभूमीदरम्यान ईव्हीएमविरोधाचा एल्गारRead this story in English
संबंधित विषय