Advertisement

गुरुवारी 27 जुलै मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये बंद राहणार

IMD कडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गुरुवारी 27 जुलै मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये बंद राहणार
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेने गुरुवारी शहरात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवल्यामुळे मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील.

भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट आधी जारी केला होता. पण आता बदल करून ‘रेड’मध्ये श्रेणीसुधारित केली आहे.

आज रात्री ८ वाजल्यापासून गुरुवारी दुपारपर्यंत शहर आणि उपनगरात अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 

भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. 

या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुटी जाहीर केली आहे.

तसेच, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.



हेही वाचा

मुंबईत लागू झालेली 10 टक्के पाणीकपात पालिका रद्द करणार?

मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलावही ओव्हरफ्लो

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा